Rahul Gandhi on Voter Fraud : महाराष्ट्रात ४० लाख संशयित मतदार,राहुल गांधींचा गंभीर आरोप

महाराष्ट्रामध्ये तब्बल चाळीस लाख संशयित मतदार असल्याचा गंभीर आरोप Rahul Gandhi यांनी केला. Rahul Gandhi यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्रीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. कर्नाटक आणि महाराष्ट्रात लाखो मतांची चोरी झाल्याचा आरोप Rahul Gandhi यांनी केला. महाराष्ट्र आणि कर्नाटकात पाच पद्धतींनी मतांची चोरी झाली असे त्यांचे म्हणणे आहे. निवडणूक आयोगाकडे मतदार याद्यांचा Digital Data मागवला तसेच मतदान केंद्राचे CCTV फुटेज मागवले, मात्र ते दिले नाही असे Rahul Gandhi यांनी म्हटले. मतदान चोरीबाबत केलेल्या आरोपांवर महायुतीकडून जोरदार हल्लाबोल करण्यात आला. महाराष्ट्रात मतांची नाही तर Rahul Gandhi यांच्या डोक्यातील Chip ची चोरी झाल्याची टीका मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी केली. या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

Comments are closed.