Voter Fraud Allegations | राहुल गांधींचे गंभीर आरोप, फडणवीसांचा पलटवार!

राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्रात चाळीस लाख संशयित मतदार असल्याचा दावा त्यांनी केला. कर्नाटक आणि महाराष्ट्रात लाखो मतांची चोरी झाल्याचा आरोप राहुल गांधींनी केला असून, ही चोरी पाच वेगवेगळ्या पद्धतीने झाल्याचे म्हटले आहे. निवडणूक आयोगाकडे मतदार याद्यांचा डिजिटल डेटा आणि मतदान केंद्रांचे सीसीटीव्ही फुटेज मागितले असता ते दिले गेले नाही, असेही त्यांनी सांगितले. या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी जोरदार पलटवार केला आहे. “मतांची नाही तर राहुल गांधींच्या डोक्यातल्या चिपची चोरी झाली आहे,” अशी टीका त्यांनी केली. राहुल गांधी रोज खोटं बोलतात आणि वेगवेगळे आकडे देतात, असेही फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रात पाच महिन्यांत पाच वर्षांपेक्षा जास्त मतदार वाढले, तसेच मतदारांची संख्या महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त असल्याचा दावा राहुल गांधींनी केला. बिहार निवडणुकांमध्ये पराभव दिसत असल्याने हे रडगाणं सुरू असल्याचा आरोपही करण्यात आला.

Comments are closed.