Vote Theft Allegations | राहुल गांधींची Bihar मध्ये ‘मतदार अधिकार यात्रा’, 25 जिल्ह्यांत प्रवास
राहुल गांधी यांनी बिहारमध्ये ‘मतदार अधिकार यात्रा’ सुरू केली आहे. ही यात्रा मतचोरीच्या विरोधात आहे. एकूण सोळा दिवस चालणारी ही यात्रा पंचवीस जिल्ह्यांमधून सुमारे तेराशे किलोमीटरचा प्रवास करणार आहे. या यात्रेत बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि इंडिया आघाडीमधील महत्त्वाचे नेते सहभागी होणार आहेत. आज या यात्रेचा दुसरा दिवस आहे. बिहारच्या औरंगाबादमधील कटुबा येथून यात्रेला पुन्हा सुरुवात झाली. कालच राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेमध्ये भाजपा आणि निवडणूक आयोगावर आरोप करत पुरावे सादर केले होते. मतदारांचे अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी ही यात्रा काढण्यात येत आहे.
Comments are closed.