Raj Thackeray – CM Fadnavis | वाहतूक, पार्किंगबाबत फडणवीसांना आराखडा दिला, राज ठाकरेंनी दिली माहिती
तीन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे मुंबईची दुरवस्था झाली. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुंबईच्या विकास प्लॅनिंगचा आराखडा त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे सादर केला. माणसांचा लोंढा, वाहतूक कोंडी आणि बेशिस्त पार्किंग यांसारख्या मुद्द्यांवर राज ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली. या समस्यांवर उपाययोजनाही त्यांनी सुचवल्या. राज ठाकरे यांनी म्हटले की, ‘या सगळ्या गोष्टींवर मार्ग काढायचा सोडून आपण कबूतर, हत्ती यासारख्या विषयात अडकून पडलो आहोत.’ कबूतरांच्या मुद्द्यावरुन त्यांनी जैन समाजाला फटकारले. सध्याच्या वराहाच्या वादावर बोलताना त्यांनी उंदराचे उदाहरण दिले. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपले मुद्दे मांडले.
Comments are closed.