Ratnagiri Uday Samant : उद्या रत्नागिरीतून ठाकरे पक्षाला खिंडार, उदय सामंत यांचं वक्तव्य ABP Majha

Ratnagiri Uday Samant : उद्या रत्नागिरीतून ठाकरे पक्षाला खिंडार, उदय सामंत यांचं वक्तव्य ABP Majha
राज्यात पुन्हा एकदा फोडोफोडीचं राजकारण रंगणार असल्याची चर्चा सुरू झालीय. दावोस दौऱ्यावरून नुकत्याच परतलेल्या उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एक मोठा दावा केलाय. रत्नागिरीतून ठाकरे गटाला खिंडार पडायला सुरुवात होणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्याचा मुहूर्तही त्यांनी सांगितलाय. रत्नागिरीतले ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार उद्या शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा त्यांनी केलाय. त्यांच्यासोबत अजून चार आमदारही सेनेत येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. सोबतच काँग्रेसचे पाच आमदार आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे तीन खासदारही शिवसेनेत येणार असल्याचा दावा त्यांनी केलाय. राजन साळवी रत्नागिरीतले ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार आहेत. साळवी ठाकरेंना रामराम करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगलीय. निवडणुकीतल्या पराभवानंर अस्वस्थ झालेल्या साळवींनी उद्धव ठाकरेंचीही भेट घेतली होती. त्यावेळी दोघांमध्ये खडाजंगी झाल्याचीही माहिती होती.

Comments are closed.