Rupali Chakankar On Vaishnavi Hagawane | वैष्णवी हगवणे प्रकरणावर थेट भूमिका; रुपाली चाकणकर ‘माझा’वर
Rupali Chakankar On Vaishnavi Hagawane | वैष्णवी हगवणे प्रकरणावर थेट भूमिका; रुपाली चाकणकर ‘माझा’वर
पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणाची सध्या जोरदार चर्चा आहे . सासरच्या मानसिक आणि शारिरीक त्रासाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे (वय 23) हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे यांना मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक केली आहे. राजेंद्र हगवणे हे अजित पवार गटाचे सदस्य असल्याने या प्रकरणाने आता राजकीय वातावरणही तापले आहे. राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणेला जमीन खरेदी करण्यासाठी माहेरहून पैसे आणायला लावले .या घटनेनंतर दररोज या प्रकरणात धक्कादायक खुलासे समोर येत आहेत .
आजच्या इतर महत्वाच्या घडामोडी –
वैष्णवी हगवणेंचं नऊ महिन्यांचं बाळ कस्पटे कुटुंबाकडे सुपूर्द, बाणेर हायवेजवळ अज्ञाताने बाळ सोपवल्याची कुटुंबीयांची माहिती
अजित पवारांकडून कस्पटे कुटुंबाचं फोनवरुन सांत्वन… लग्नाच्या वेळी कल्पना दिली असती तर लग्नच होऊ दिलं नसतं, वैष्णवीला न्याय देणार, अजित पवारांचं आश्वासन..आदिती तटकरे आणि उदय सामंतांनीही घेतली सांत्वनपर भेट…
केवळ हकालपट्टी नको तर राजेंद्र हगवणेंना तातडीने अटक करा, वैष्णवीच्या वडिलांची मागणी… सूनेच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर हगवणे फरार
नणंद करिष्मा छळाचं कारण, तर नवरा घरात नसताना सासू, सासरे, दीर आणि नणंद मारहाण करायचे, हगवणेंची सोडून गेलेले मोठी सून मयुरीचा आरोप
Comments are closed.