Rupali Chakankar Resign | रुपाली चाकणकरांचा महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा
रुपाली चाकणकर यांनी महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय. अशोक खरातसोबत फोटो व्हायरल झाल्यानंतर त्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या.
त्यानंतर अखेर त्यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिलाय.
खरात प्रकरणाबाबत पहिल्या दिवशीच मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे.त्याच्या आर्थिक व्यवहारात,त्याच्या गैरकृत्यात दुरान्वये संबंध नाही,आजही तीच स्पष्ट व ठाम भूमिका आहे.तपासादरम्यान या सर्व बाबी निष्पन्न होतीलच. खोटे,असत्य व कुठलाही पुरावा नसताना जे आरोप माध्यमांमधून होत आहेत,ते… pic.twitter.com/9awsGZmgJL
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) March 27, 2026
शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अशोक खरातवर कारवाई झाली. अशोक खरातसोबत रुपाली चाकणकरांचे काही फोटो व्हायरल झाल्यानंतर चाकणकरांवर टीका होऊ लागली. चाकणकर या अशोक खरातला गुरू मानायच्या, त्यामुळे या आधीच्या काही प्रकरणामध्ये चाकणकरांनी राजकीय हस्तक्षेप केल्याचं समोर आलं होतं.
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांनी राजीनामा द्यावा यासाठी विरोधी पक्षांनी दबाव टाकला. तसेच राष्ट्रवादीतील एका गटानेही ही मागणी केल्याची माहिती समोर आली. त्यानंतर आधी रुपाली चाकणकरांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा दिला आहे.
Comments are closed.