Sachin Gujar : Ahilyanagar काँग्रेस जिल्हाध्यक्षांच अपहरण? बेदम मारहाण करुन रस्त्यावर दिलं सोडून

निवडणुकीची धामधूम सुरु असताना अहिल्या नगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली. काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचं भर रस्त्यातून अपहरण करण्यात आलं, त्यांचा शोध सुरु असतानाच,मारहाण करुन त्यांना रस्त्यावर सोडून देण्यात आलं. या घटनेनं जिल्ह्यात एकच खळबळ माजली. विरोधकांनी कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सरकारवर टीकाही केली. नंतर या प्रकरणातील वेगवेगळे कंगोरेही समोर आले. काय आहे प्रकरण पाहुयात
सीसीटीव्हीत ज्या व्यक्तीला   जबरदस्तीनं गाडीत टाकण्यात आलंय…  ते आहेत अहिल्यानगरचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर…
मॉर्निंग वॉकला गेलेल्या सचिन गुजरांना  एका कारमधून आलेल्या दोघांनी रस्त्यावर अडवलं,   काहीतरी भांडण काढून त्यांना बळजबरीने कारमध्ये बसायला लावलं.   श्रीरामपुरात भर दिवसा सकाळी सात वाजता ही अपहरणाची घटना घडली…  बेलापूर बनात नेऊन त्यांना बेदम मारहाण करण्यात आली.   मारहाणीनंतर हल्लेखोरांनी त्यांना रस्त्यावर फेकून दिलं आणि हल्लेखोर पसार झाले.   मारहाणीत सचिन गुजर गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.   घटनेची माहिती समजताच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी तातडीने श्रीरामपूर गाठत गुजर यांची भेट घेतली.

Comments are closed.