Sanjay Mandalik Kagal : मुश्रीफ-घाटगेंची युती ED पासून वाचण्यासाठी, मंडलिकांचा हल्ला

Sanjay Mandalik Kagal : मुश्रीफ-घाटगेंची युती ED पासून वाचण्यासाठी, मंडलिकांचा हल्ला
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल मध्ये हसन मुश्रीफ आणि समरजीत घाटगे यांच्यामध्ये झालेली युती आणि प्रॉपर्टी ची आहे अशी टीका माजी खासदार संजय मंडलिक यांनी केली आहे…. कागल तालुक्याच्या विकासासाठी आपण एकत्र आल्याचे हे दोन्ही नेते सांगत असले तरी एका नेत्याची प्रॉपर्टी वाचवायची आहे आणि दुसऱ्याला मधून सुटका करून घ्यायचे आहे असे संजय मंडलिक म्हणाले…शिवाय आमच्या उमेदवारांना दबाव टाकून अर्ज मागे घेण्यास भाग पाडू नये म्हणून सुरक्षित ठिकाणी ठेवले आहे…. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जो एकाकी पडतो त्याच्या पाठीशी जनता उभी राहते कागल मध्ये देखील माझ्या पाठीशी संपूर्ण जनता उभी राहिली आहे…. असं संजय मंडलिक यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटला आहे…. त्यांच्याशी संवाद साधलाय आमची प्रतिनिधी विजय केसरकर यांनी….

इतर महत्वाच्या बातम्या – 20 Nov 2025 –
आरोप-प्रत्यारोप होतच राहतील पक्ष बांधणीचं काम जोमानं सुरू ठेवा, शिंदेंच्या नाराजीनाट्यानंतरही भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या सूचना…शिंदेंच्या दिल्लीवारीनंतर फोडाफोडावरून भाजप-शिवसेनेत सामंजस्य झाल्याचा दोन्ही बाजूंचा दावा…

भाजप आणि शिवसेनेमधली तहाची भूमिका केवळ कागदावरच… जामनेरमध्ये भाजपकडून शिंदेंचे उमेदवार गळाला, तर हिंगोलीत शिंदेंच्या सेनेचा भाजपला शह…

मुंबईत नवाब मलिकांवरून महायुतीत मिठाचा खडा…राष्ट्रवादीकडून मलिकांना निवडणुकांची जबाबदारी…मनी लॉन्ड्रिंगचा आरोप असलेल्या मलिकांना भाजपचा विरोध…

नागपूर काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह टोकाला…माजी मंत्री सुनील केदारांच्या कार्यशैलीविरोधात प्रचंड नाराजी…पण पक्षश्रेष्ठी मात्र वेट अँड वॉचच्या भूमिकेत…

Comments are closed.