Sanjay Raut PC : अर्जुन खोतकरांवर गुन्हा दाखल करा, त्यांना अटक करा; संजय राऊतांची मागणी

Sanjay Raut PC : अर्जुन खोतकरांवर गुन्हा दाखल करा, त्यांना अटक करा; संजय राऊतांची मागणी

महाराष्ट्रातला भ्रष्टाचार हा विधीमंडळापर्यंत पोहचलाय
या राज्यात फडणवीस, शिंदे, अजित पवार यांच्या राज्यात हा भ्रष्टाचार हा विधीमंडळापर्यंत पोहचलाय
शासनातर्फे जी कामं होतात नियमाप्रमाणे झालीत की नाही याचे तपास करण ही सगळी कमिटीद्वारे होतात
पण याकमिटीचे अध्यक्ष खोतकर
हे अध्यक्ष काल धुळ्याच्या दौर्यावर होते
१५ कोटी रुपये अंदाज समितींच्या अध्यक्षांना द्यायचा सौदा झाला होता
नाही दिले तर सगळ्यांना ब्लॅक लिस्ट करेन अशी धमकी खोतकरांनी दिली
संजय राऊतांचा खोतकरांवर गंभीर आरोप
—————————–

संजय राऊत

महाराष्ट्रातला भ्रष्टाचार कोणत्या थरापर्यंत गेलेला आहे विधिमंडळापर्यंत तो गेलेला आहे
देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या राज्यात या मंदिरापर्यंत भ्रष्टाचार पोहोचला
राज्याचे मुख्यमंत्री विधानसभेचे अध्यक्ष या घोटाळ्याचे मुकसमर्थक आहेत
कमिटीचे चेअरमन अर्जुन खोतकर जे ई डी ला घाबरून शिवसेनेत गेले ते किती भ्रष्ट आहेत
गेल्या तीन दिवसांपासून पाच ते साडेपाच कोटींची कॅश धुळ्याच्या त्या विश्रामगृहात जमा होते
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कामांमध्ये इतर क्षेत्राच्या कामांमध्ये प्रचंड घोटाळे
कमी दर्जाची कामे झालेली आहेत या सर्व ठेकेदारांकडून 15 कोटी जमा करण्याची जबाबदारी अंदाज समितीच्या अध्यक्षांकडे
ठेकेदाराने घेतली त्यासाठी अध्यक्षांचे पीए 102 क्रमांकाच्या खोलीमध्ये पैसे जमा करत होते 15 कोटी रुपये अंदाज समितीच्या अध्यक्षांना देण्याच ठरल होता
पुढल्या दोन दिवसात दहा कोटी जमा होणार होते नाहीतर सर्व ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची शिफारस मी करेन अशी धमकी अर्जुन खोतकर यांनी दिली त्यानंतर हे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली
गोटे साहेबांनी शिवसैनिकांसह विश्रामगृहावर धडक मारले शिवसैनिक येताच हे कार्यालयातील लोकं टाळ लावून पळून गेले
तपास यंत्रणांनी ही खोली  त्याचा पंचनामा करावा संबंधित लोकांवर कार्यवाही करावी अशी मागणी करूनही चार ते पाच तास ना पोलिस ना जिल्हाधिकारी आले
आमच्या दबावानंतर ही लोक आली
आता सर्व काखा वर करतील हे 15 कोटी रुपये शिंदे गटाच्या जालनाच्या आमदार खोतकर यांना देण्यासाठी जमा झाले होते
त्यांना वाचविण्याचे प्रयत्न सुरू आहे त्यांच्या नावावर ही खोली होती त्यांच्यावर गुन्हा दाखल करून हे प्रकरण ईडी आणि सीबीआयला देणं गरजेचं आहे
अंदाज समितीच्या बैठका कशा आणि कुठे झाल्या याची चौकशी झाली पाहिजे आतापर्यंत शंभर कोटी जमा झाले असते हे एकनाथ शिंदे फडणवीस अजित पवार यांच्या काळातल हे राज्य आहे

Comments are closed.