Snajay Raut vs Navnath Ban : निवडणूक आयोग भाजपची शाखा? राऊत-बन यांच्यात आरोप-प्रत्यारोप

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि भाजप प्रवक्ते नवनाथ बबन (Navnath Baban) यांच्यात मतदार यादीतील घोळावरून जोरदार शाब्दिक युद्ध पेटले आहे. ‘निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाची एक्सटेंडेड शाखा आहे,’ असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला. निवडणूक आयोगाची तुलना ABVP आणि RSS सारख्या संघटनांशी करत, आयोगातील नेमलेली माणसे भाजप कार्यकर्त्यांप्रमाणे वागत असल्याचा दावा त्यांनी केला. यावर भाजपचे प्रवक्ते नवनाथ बबन यांनी ‘ज्याप्रमाणे कंसाला शेवटच्या काळात सगळीकडे श्रीकृष्ण दिसत होते, त्याचप्रमाणे संजय राऊत यांना प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पार्टी दिसतेय,’ अशा शब्दात प्रत्युत्तर दिले. संजय राऊत आणि त्यांच्या गटाचा हा शेवटचा कार्यकाळ असल्याची टीकाही बबन यांनी केली आहे.

Comments are closed.