Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत, अनिल परब राज ठाकरेंच्या भेटीला!

Sanjay Raut on Raj Thackeray Uddhav Thackeray: राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी पत्रकार परिषद घेऊन मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर आता मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे दोघे काय करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागणार आहेत. आता याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठं वक्तव्य केलंय. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा-भाईंदर, पुणे आणि नाशिक या प्रमुख महापालिकेमध्ये आम्ही एकत्र लढत आहोत, अशी माहिती त्यांनी दिली आहे. तर संजय राऊत आज राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

संजय राऊत म्हणाले की, काल मुंबईसह 29 महापालिकांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या. त्यानंतर अंगात उत्साह संचारलेला आहे. ट्रीटमेंट चालूच राहील. पण, ही लढाई मराठी माणसाची शेवटची अस्मितेची लढाई आहे. मराठी माणूस कोणत्याही पदावर असो, कोणत्याही परिस्थितीत असो, त्याने या लढाईत मुंबई वाचवण्यासाठी उतरायला पाहिजे. मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून काही पोस्टर्स लागले आहेत. मुंबई वाचवण्यासाठी मराठी माणसाला आवाहन करण्यासाठी पोस्टर्स लागलेत. त्यात कुठल्याही पक्षाचे नाव नाही. सरकारला भीती वाटली आणि त्यांनी एका रात्रीत हे पोस्टर काढायला लावले. का तर म्हणे आचारसंहितेचा भंग होत आहे. आचारसंहिता मराठी माणसाला, आचारसंहिता विरोधी पक्षाला आणि या सरकारच्या लोकांना काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Comments are closed.