Sanjay Raut PC : अजितदादांची ‘ती’ फाईल ते अमित शाहांवर निशाणा, राऊतांची स्फोटक पत्रकार परिषद
Sanjay Raut on Ind Vs pak T20 World Cup 2026: भारताने टी-20 विश्वचषक 2026 मध्ये (T20 World Cup 2026) पाकिस्तानवर 61 धावांनी दणदणीत विजय मिळवत सुपर-8 मध्ये दमदार एन्ट्री मारली. आधी फलंदाजी आणि मग गोलंदाजी दोन्ही आघाड्यांवर टीम इंडियाने अफलातून कामगिरी करत पाकिस्तानला लोळावलं. या सामन्यात देखील भारताच्या खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन करणे टाळले. भारताचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी या धोरणावर कडाडून टीका करत याला ‘मूर्खपणा’ म्हटले आहे. आपल्यासारख्या देशासाठी ते योग्य नाही एक तर त्यांच्याविरुद्ध खिलाडू वृत्तीने खेळा किंवा खेळूच नका, असे देखील संजय मांजरेकर यांनी म्हटले. आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भारत-पाक सामन्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.
संजय राऊत म्हणाले की, खेळू नका, या मताशी मी पूर्ण सहमत आहे. हा सामना भारत-पाकिस्तान नसून जय शाह विरुद्ध पाकिस्तान असा आर्थिक सामना होता. पैशासाठी खेळायला गेलेला हा सामना होता. तुम्ही त्यांच्यासोबत खेळत आहात आणि मग निकाल लागल्यावर खिलाडू वृत्तीने एकमेकांना हस्तांदोलन केलं पाहिजे. का केले नाही? मग खेळता कशाला? भारतीय क्रिकेटपटूंना लाज वाटली पाहिजे. त्यांच्यामध्ये पण अंधभक्त भिनले आहे. त्यांना सुद्धा ड्रेसिंग रूममध्ये जाऊन धमक्या दिलेल्या आहेत. मांजरेकर यांचे म्हणणं हे शंभर टक्के सत्य आहे. खेळा किंवा खेळू नका. खेळत आहात तर खेळाडू म्हणून खेळा. माझ्या पक्षाची भूमिका आहे की पाकिस्तान सोबत खेळू नका. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ही भूमिका आहे. जोपर्यंत पहलगामचा बदला पूर्ण होत नाही, तोपर्यंत खेळू नका, असे त्यांनी म्हटले.
Comments are closed.