Sanjay Raut PC : मोदींनी इस्रायल-इराणचं युद्ध थांबवावं, युद्धाचे परिणाम भारताला भोगावे लागणार – राऊत
Sanjay Raut PC : मोदींनी इस्रायल-इराणचं युद्ध थांबवावं, युद्धाचे परिणाम भारताला भोगावे लागणार – राऊत
ही चांगली गोष्ट आहे. जरी इरानच्या दृष्टीने ही दुखद गोष्ट असली तरी जगासाठी सुद्धा ही दुखद घटना आहे. एका देशाच्या राष्ट्रप्रमुखाला अशा पद्धतीनं ठार करणं एखाद्या देशाच्या राष्ट्रप्रमुखाला रात्री त्याच्या घरात घुसून किडनॅप करून न्यूयॉर्कला आणणं एखाद्या देशाच्या राष्ट्रप्रमुखाला ठार करा अशी चिथावणी देणं या गोष्टी जागतिक पातळीवरती निषेधार्ह आहे. कोणी असतील त्या देशातली सत्ता उलथून टाकण्याचं काम हे लोकशाही मार्गाने तेथील जनतेनेच करायला पाहिजे. उद्या नरेंद्र मोदी यांच्या विषयी प्रेसिडेंट ट्रम्पला वाटलं की मी इथे सैन्य घुसवेन आणि नरेंद्र मोदींना उलथून टाकेन आम्ही होऊ देणार आम्ही त्यांच्या सत्तेचा पराभव लोकशाही मार्गाने करू. उद्या इझ्रायलला वाटलं की मोदी आमचा ऐकत नाहीत आता आणि स्वतंत्रपणे निर्णय घेऊ लागलेले आहेत राष्ट्रहिताचे म्हणून आम्ही त्यांच्यावर हल्ला करू. आम्ही हे एक देश म्हणून हे कदापि होऊ देणार नाही. पण जर इरानच्या बाबतीमध्ये अशा गोष्टी घडत असतील तर भारतासारख्या मोठ्या राष्ट्रानं त्याचा निषेध केला पाहिजे. खरं म्हणजे मोदी इतके मोठे नेते आहेत असं त्यांचे लोकं मानतात की त्यांनी या युद्धामध्ये मध्यस्थता करून हे युद्ध थांबवायला पाहिजे होतं. आणि इरानमध्ये किंवा गाजामध्ये जो नरसंहार सुरू आहे इझ्रायलच्या माध्यमातून तो थांबवायला पाहिजे. एका मुलींच्या शाळेवरती हल्ला होतो आणि 200 लहान मुलींना ठार केलं जातं याचं कौतुक इझ्रायलला असेल अमेरिकेला असेल तर मानवतेच्या दृष्टिकोनातून भारतानं त्याचा निषेध करायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. आम्ही एखाद्या युद्धात एखाद्या राष्ट्राची बाजू घ्या असं म्हणत नाही. भारताच्या सागरी हद्दीमध्ये हा नौदलाच्या संचलनासाठी प्रदर्शनासाठी आपल्या आमंत्रणावरून इरानचं नौदल इथे आलं. त्यांचं युद्ध नौका इथे आली ही आमची जबाबदारी आहे त्यांना सुखरूप परत पाठवणं पाहुणे म्हणून जे आमच्याकडे येतात त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणं आणि त्यांना पुन्हा घरापर्यंत पोहोचवणं ही यजमान देशाची भूमिका असायला पाहिजे. पण इरानच्या नौदलातली एक युद्धनौका आमच्या विनंतीवरून आमच्या आमंत्रणावरून भारतामध्ये येते राष्ट्रपथी समोर त्याचं संचलन होतं आणि जाताना हिंद महासागरामध्ये त्या बोटीवर अमेरिका हल्ला करते इझ्रायल हल्ला करते आणि ती बोट बुडवून 90 नौसैनिकांना नौदलाच्या इरानच्या ठार केलं जातं आणि त्याचा सुद्धा भारताकडून निषेध होत नाही हे सुद्धा दुखद आणि धक्का दायक तर साहेब हा शोक व्यक्त करायला विलंब झालाय का? नक्कीच नक्कीच जगानं अश्रू ढळल्यावरती लोकलाजेस्तव व्यक्त केलेले दुःख आहे लोकलाजेस्तव पण भारताला आता कोणतंही राष्ट्रीय धोरण नाही परराष्ट्र धोरण नाही आणि भारत कुणाच्यातरी गुलाम म्हणून काम करतो की काय या नीती हे आता फार चिंतन जनक चित्र आम्हाला पाहावं लागतं. पण रावसाहेब मध्यंतरी भारताने जो अमेरिकेची ट्रेड बिल बिझनेस डील केली आहे त्याचे जे काही त्यातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आता समोर येत आहेत कारण आता जो युद्धाचा परिणाम दिसतोय आणि कच्च्या तेलाचे दर वाढलेले आहेत इंधन पुरवठा होणं कठीण बनलेलं आहे अशा काळात रशियाशी करार किंवा रशियाकडून 30 दिवसांचा तेल साठा घेण्या संदर्भात अमेरिकेने भारताला परवानगी दिली आहे हो ना तेच तर म्हणतोय ना अमेरिका भारताला सांगतेय की आम्ही तुम्हाला परवानगी दिली आहे रशियाकडून तेल घ्यायला आम्ही नाही ठरवत आहोत. भारताला अमेरिका नाचवतेय नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे कटपुतळी आहेत. अमेरिकेने जे त्यांच्या सेक्रेटरीने फॉरेन सेक्रेटरीने ट्विट केलंय समाज माध्यमावर ते आम्ही भारताला परवानगी दिलेली आहे परवानगी गुलाम आना देता है बरं का परवानगी गुलामाना देतात होय आम्ही तुम्हाला आज परवानगी दिलेली आहे की तुम्ही हे खरेदी करू शकता तुम्ही इथे फिरू शकता तुम्ही यांच्याशी बोलू शकता अशी परवानगी फक्त गुलाम राष्ट्रांना दिली जाते गुलाम पुन्हा पुन्हा सांगतो अमेरिकेने परवानगी दिल्यामुळे आम्ही रशियाकडून तेल खरेदी करू शकतो आम्हाला गरज आहे सध्याच्या युद्ध परिस्थितीमध्ये म्हणून आम्हाला रशियाकडून तेल खरेदी करण्याची आमच्यामध्ये हिम्मत नाही. अमेरिकेच्या मेहेरबानीवरती आम्ही रशियाकडून तेल खरेदी करणार असू तर थू तुमच्या जिंदगानीवर पण रावसाहेब या सगळ्या युद्धजन्य परिस्थिती किंवा जे काही सगळं सुरू आहे आखाती देशात चीन आणि रशिया हे इरानच्या बाजूने उभे ठाकलेले दिसतात. हळूहळू बरचसा जगातले अनेक प्रमुख राष्ट्र हे युद्धखोरीच्या विरोधात उभे राहतात. आणि या जगामध्ये दोन देश युद्धखोर आहेत ज्यांनी इरानवर हल्ला केला. भारतानं कायम शांततेचा संदेश दिला पंचशीलाचा मार्ग स्वीकारला पंडित नेहरूंचा तटस्थतेचा मार्ग स्वीकारला आणि भारताला सुद्धा भविष्यामध्ये याच मार्गाने जावं लागेल. कारण ज्या पद्धतीनं भारताचं नेतृत्व या सगळ्या प्रश्नात चुप आहे याचा अर्थ या युद्धखोर लांडग्यांविरुद्ध उभं राहायची त्यांच्यामध्ये हिम्मतच नाहीये. आता नाटोचे सदस्य असलेले राष्ट्र जे आहेत त्या अनेक राष्ट्रांनी युद्धापासून माघार घेतलेली आहे. की आम्ही इझ्रायल आणि अमेरिकेबरोबर युद्धात सहभागी होणार नाही त्याच्यामध्ये स्पेनच्या राष्ट्रप्रमुखांनी ही भूमिका घेतलेली आहे. त्याच्यामध्ये ब्रिटनच्या प्राइम मिनिस्टर यांनीही भूमिका घेतलेली आहे. त्यानंतर इतर काही राष्ट्र याच भूमिकेत येत आहेत. हे युद्ध बराच काळ चालणार आहे सात आठ दिवस 10 दिवस पण बराच काळ युद्ध चालेल इरानची जनता झुंझार आहे असं माझं कायम म्हणणं आहे. त्यांना एक फार मोठी परंपरा आहे शेकडो वर्षांची आणि त्याचे परिणाम भविष्यामध्ये भारताला भोगावे लागतील असं मला सारखं आम्हाला वाटतंय. त्या परिणामांबद्दलच विषय उपाययोजनांच्या बाबतीत धोरणांच्या बाबतीत आत्ताच देशातली निर्यात करा खूप झालेली आहे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे त्यानंतर निर्यातीवरती फार बंधनं आलेली आहेत. आमचं शेती उत्पादन आमचं फळ फळावळ आमचं इतर काही अनेक गोष्टी कपडा बरं का टेक्सटाइल या सगळ्या गोष्टींवरती बंधनं आलेली आहेत. आणि ह्याच्यावरती सरकारकडे कोणतीही भूमिका याक्षणी नाही. आमचे हजारो लोकं ठिकठिकाणी अडकून पडलेले आहेत.
राजकारण व्हिडीओ
Sanjay Raut PC : मोदींनी इस्रायल-इराणचं युद्ध थांबवावं, युद्धाचे परिणाम भारताला भोगावे लागणार – राऊत
शॉर्ट व्हिडीओ
आणखी पाहा
Comments are closed.