Sanjay Raut PC : मोदी-शाह आणि बाळासाहेबांबत ‘नरकातला स्वर्ग’ पुस्तकातून संजय राऊतांचे स्फोटक दावा
Sanjay Raut PC : मोदी-शाह आणि बाळासाहेबांबत ‘नरकातला स्वर्ग’ पुस्तकातून संजय राऊतांचे स्फोटक दावा
मी जे काही पुस्तकात लिहिलं त्याला गौप्यस्फोट म्हणत नाही हे माझ्या तुरुंगातले अनुभव आहेत मला राजकीय सुडापोटी तुरुंगात पाठवलं अनेक गोष्टी मी भूतकाळात पाहिल्या अनुभवल्या ऐकल्यात बाळासाहेब ठाकरे शरद पवार यांनी कश्याप्रकारे मदत केली याचा संदर्भ दिला उपकाराची पेढी अपकराने कशी केली? पक्ष या लोकांनी फोडले एक नवीन स्वभाव समोर आला मी अनेक गोष्टी लिहिल्या असत्या हाहाकार माजला असता पण मी मर्यादा पुरषोत्तम रामाचा भक्त आहे त्यामुळे मर्यादा पाळताय राज ठाकरे यांनी संकटकाळात फोन करायला पाहिजे होता एक आधार याने मिळतो संकटाचा डोंगर आमच्या कुटूंबावर पडला होता मी जे काही लिहलंय ते १०० टक्के खरं आहे ३५ मिनिटाची फोनवरील चर्चा आहे बाळासाहेब ठाकरे यांची ती मी चर्चा टाकली नाही बाळासाहेब ठाकरे यांचे आदराचे संबंध सगळ्या सोबत आहे. जेवढं मला शक्य आहे तेवढं मी लिहिलं आहे दिल्लीत भाजपचे जेष्ठ नेते मला सांगायला आले होते महाविकास आघाडी सरकार आम्ही पाडणार आहोत दिल्लीत निर्णय आमचा झाला आहे आणि मला शांत राहयला सांगितलं… नाहीतर तुम्ही तुरुंगात झालं असा मला सांगितलं त्यानंतर मी हे सगळं व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून सांगितलं मी हयात आहे शरद पवार हयात आहेत पवार काय सांगतील मला माहित नाही मी शरद पवार यांना सांगितलं असा प्रकरण मी लिहिले आहे त्यावर पवार म्हणले कीं अमित शाह यावर स्पष्टीकरण काय देतात हे पाहावं लागेल शाह अडचणीत असताना मोदी यांनी पवार यांना फोन केला होता हे व्यक्ती खास आणि कामाचा माणूस आहे असा मोदी पवार यांना म्हणाले पवार यांनी विचारलं होतं कीं अमित शाह कोण आहे? ते त्यावेळी त्यांना फार ओळखायचा नाही संजय राऊत यांना सनसनाटी पसरविण्यासाठी पुस्तकं लिहायची गरज नाही…या सगळ्या गोष्टी सत्य आहेत नरकातला स्वर्ग या मराठी नंतर इंग्रजी अनुवाद असलेले पुस्तकाचे प्रकाशन सुद्धा दिल्लीत होणार आहे… राहुल गांधी यांच्या उपस्थितीत हे प्रकाशन होईल आताच्या भाजप नेत्यांना काहीही माहिती नाही संजय राऊत यांना पब्लिसिटी ची गरज नाही तुम्ही सगळे फ्री मध्ये पब्लिसिटी देतात आम्ही बोलतो आणि लिहितो.. त्यामुळे मला पब्लिसिटी गरज नसते आम्हाला मिळते… अमित शाह यांना त्यावेळी कोणीही ओळखत नव्हतं एकदा त्यांचा फोटो पेपर मध्ये आला त्यावेळी बाळासाहेब ठाकरे मला म्हणाले हा व्यक्ती तोच आहे ना जो आपल्या घरी आला होता मी म्हणालो हो हे अमित शाह आहेत.
Comments are closed.