Sarita Mhaske Mumbai : काल शिंदे गटात, आज पुन्हा सरिता म्हस्के ठाकरे गटात, नेमकं काय घडलं?

Sarita Mhaske Mumbai : काल शिंदे गटात, आज पुन्हा सरिता म्हस्के ठाकरे गटात,  नेमकं काय घडलं?

सरिता म्हस्के या शिंदे गटाच्या गळाला लागल्याची माहिती समोर आली होती. सेना भवनातील नगरसेवकांच्या बैठकीला डॉ. सरिता म्हस्के गैरहजर राहिल्या. त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या गट नोंदणीवेळी देखील सरिता म्हस्के अनुपस्थित होत्या. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आले होते. मुंबईत ठाकरे गटाचे 65 नगरसेवक निवडून आले आहेत. एकीकडे शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये महापौरपदासाठी चढाओढ असताना दोन्ही गटांकडून इतर नगरसेवकांना गळाला लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अशात ठाकरेंच्या एक नगरसेविका शिंदे गटाच्या गळाला लागल्याची माहिती आली होती. त्यानंतर आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत गेलेल्या सरिता म्हस्के पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत दाखल झाल्या आहेत. ठाकरे गटाच्या सरिता म्हस्के यांनी प्रभाग क्रमांक 157 मधून भाजपच्या आशा तायडे यांचा पराभव केला आहे.

Comments are closed.