मुस्लिमांवर शरद पोंक्षे : प्लंबर असो वा सुतार, तो हिंदूच, शरद पोंक्षे यांचे वादळी विधान

Sharad Ponkshe On Hinduism: मालेगाव महापालिकेच्या (Malegaon Municipal Corporation) मुस्लिम उपमहापौरांनी आपल्या दालनात लावलेल्या टिपू सुलतानाच्या (Tipu Sultan) फोटोवरुन सध्या गदारोळ माजला आहे.यावर मराठी अभिनेते शरद पोंक्षे (Actor Sharad Ponkshe) यांनी टीका केली आहे. हिंदूवर अत्याचार करणाऱ्याचा फोटो आज मालेगाव महापालिकेच्या मुस्लिम उपमहापौर लावतात; इतकी भयाण परिस्थिती पण हिंदू जागाच होत नाही, असं शरद पोंक्षे म्हणाले आहेत.

ज्यानं हजारो हिंदू स्त्रियांवर अत्याचार केले, त्यांना गुलाम बनवलं… लाखो लोकांना जबरदस्तीनं मुस्लिम धर्म स्वीकारणास भाग पाडलं. मंदिरं उध्वस्त केली, मुर्ती फोडल्या… अशा  माणसाचा फोटो मालेगाव महापालिकेच्या मुस्लिम उपमहापौर महिलेनं लावला आहे, इतकी भयाण परिस्थिती आहे, पण हिंदू जागाच होत नाही. म्हणून तर अशी हिंदूंची प्रदर्शनं भरवण्याची वेळ येते, असंही शरद पोंक्षे म्हणाले आहेत.

सांगलीत  हिंदू व्यवसाय बंधू आणि सर्वमंगल ग्रुपच्या वतीनं आयोजित केलेल्या गृहोपयोगी वस्तू आणि साहित्य प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी शरद पोंक्षे बोलत होते. आपल्या घरातील  फ्रीज, फॅन यांसारख्या काही वस्तू बिघडल्या, तर दुरुस्त करण्यासाठी हिंदू टेक्निशियनच बोलवावा. अशा सेवा देणाऱ्यांचे नंबर प्रत्येक ग्रुपमध्ये शेयर करावेत. हिंदुनी हिंदूसाठीच व्यवसाय करावा. घरी लागणाऱ्या भाज्या, वस्तू या हिंदू माणसाकडेच खरेदी कराव्यात. अहिंदू माणसाकडे कोणतीही खरेदी करू नये, असा सल्लाही शरद पोंक्षे यांनी यावेळी दिला.

शरद पोंक्षे नेमकं काय म्हणाले? शब्दन् शब्द जसाच्या तसा…
शरद पोंक्षे बोलताना म्हणाले की, “एकवेळेस गांधीजींचा फोटो लावला नाहीतरी चालेल, पण नेहरुंचा तरी लावला पाहिजे. सेक्युलर देशामध्ये मुस्लिम पर्सनल लॉ आणणाऱ्या माणसाचा तरी फोटो लावला पाहिजे… वक्फ बोर्ड कायदा आणणाऱ्या माणसाचा तरी फोटो लावला पाहिजे… संविधान बचाव… संविधान बचाव… म्हणून बोंबलणारे स्वतःच सविंधानात सेक्युलरिज्म हा शब्द नंतर घुसडला त्यांचा तरी फोटो लावला पाहिजे… 79 वर्ष ज्या पक्षानं त्यांचं लांगुलचालन केलं, 79 वर्षांत त्यांनी ओरबाडून, रक्तपात करुन, 10 लाख हिंदुंचे बळी घेऊन घेतलंच… पाकिस्तान नावाचं स्वतःचं घर वेगळं घेतलंच, त्याच्यानंतरही ते इथे राहिले आणि त्यांनी इथे राहवं म्हणून त्यांच्या पाठीशी जे उभे राहिले त्यांचा तरी फोटो पाहिजे… “

Comments are closed.