Keluskar BJP Special Reportएबी फॉर्मची कलर झेरॉक्स जोडून केळुस्कर दाम्पत्यानं उमेदवार अर्ज कसा भरला?

Shilpa Keluskar BJP Special Report भाजप एबी फॉर्मची कलर झेरॉक्स जोडून यांनी उमेदवारी अर्ज कसा भरला?
तुम्हाला समजा आधार कार्ड काढायचंय… किंवा पासपोर्ट काढायचाय… तर सरकारी कार्यालयात काय-काय कागदपत्रं द्यावी लागतात, हे मी सांगायची गरज नाही… बरं अनेकदा ओरिजनल पेपर्सच द्या, असंही तिथले अधिकारी-कर्मचारी खडसावतात… अनेकदा तुमचं कामही त्यामुळे लांबणीवर पडतं… पण निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरायचा असेल, तर सर्व काही कार्य करते … मुंबईतल्या एका भाजपवासी दाम्पत्यानं हे सिद्ध करून दाखवलंय…
आता या कसंचं उत्तर खरं तर  या शिल्पा केळुस्कर आणि त्यांचे पती दत्ता केळुस्करच देऊ शकतील…  मात्र जी माहिती समोर आलीय त्यानुसार…  भाजपनं एबी फॉर्म दिलेला नसतानाही शिल्पा केळुस्कर, या मुंबईतील वॉर्ड क्रमांक १७३ म्हणजेच सायन प्रतीक्षा नगर भागातील भाजपच्या उमेदवार ठरल्यात..  तर त्याचं झालं असं..
केळुस्कर दाम्पत्यानं कसं उल्लू बनवलं? – हेडर  भाजपनं सुरूवातीला प्रभाग क्रमांक १७३ मधून दत्ता केळुस्करांना एबी फॉर्म दिला होता  जागावाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार प्रभाग क्रमांक १७३ शिंदेंच्या शिवसेनेला सुटला  शिवसेनेनं माजी नगरसेवक रामदास कांबळेंच्या पत्नी पूजा कांबळेंना उमेदवारी जाहीर केली  मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या मागणीनंतर दत्ता केळुस्करांनी एबी फॉर्म परत दिला  मात्र दत्ता केळुस्करांनी एबी फॉर्म भाजपला परत देण्याआधी त्याची कलर झेरॉक्स काढून ठेवली होती  दत्ता केळुस्करांनी पत्नी शिल्पा यांना प्रभाग क्रमांक १७३ मधून अपक्ष म्हणून उभं केलं  मात्र प्रत्यक्षात शिल्पा केळुस्करांनी एक अर्ज अपक्ष म्हणून आणि दुसरा अर्ज भाजपच्या एबी फॉर्मच्या कलर झेरॉक्ससोबत सादर केला  विशेष म्हणजे एबी फॉर्मच्या कलर झेरॉक्ससह दाखल केलेला शिल्पा केळुस्करांचा अर्ज वैध ठरला आहे
केळुस्कर दाम्पत्याच्या खेळीमुळे शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराची कोंडी तर भाजपची पंचाईत झाली..
दत्ता केळुस्कर सध्या नॉट रिचेबल आहेत.. तर मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहून शिल्पा केळुस्करांचा अर्ज बाद करण्याची विनंती केलीय केळुस्कर दाम्पत्याच्या या खेळीप्रमाणे, संभाजीनगरमधला एबी फॉर्मचा किस्साही जोरदार चर्चेत आहे

Comments are closed.