Shiv Sena UBT MNS Alliance Raj Uddhav Thackeray : दोन दिवसांत ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा?
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे: राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. यामध्ये मुंबई महानगरपालिकेचाही (BMC Election 2026) समावेश आहे. मुंबई महानगरपालिकेसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे. 16 जानेवारीला निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. या सगळ्याला आता अवघा एक महिना शिल्लक राहिल्याने सर्वच राजकीय पक्ष आजपासून जोमाने मैदानात उतरणार आहेत. या पार्श्वभूमीवर आता मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे हे दोघे काय करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागणार आहेत. ठाकरे बंधूंसाठी ही निवडणूक त्यांच्या राजकीय अस्तित्त्वाची लढाई मानली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे यांच्या मनोमीलन होऊन दोघेही नित्यनियमाने भेटीगाठी घेत असले तरी मनसे (MNS) आणि ठाकरे गटाच्या अधिकृत युतीची घोषणा झालेली नाही. आता महानगरपालिका निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यामुळे येत्या दोन दिवसांमध्ये ठाकरे बंधू मनसे-ठाकरे गटाच्या (Shivsena) युतीची घोषणा करतील, अशी शक्यता आहे. (Mumbai news)
महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर ठाकरे बंधूंची युती कधी जाहीर होणार, असा प्रश्न शिवसैनिक आणि मनसैनिकांना यांना पडला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच याच येत्या दोन ते तीन दिवसात ठाकरे बंधू आपली अधिकृत युती जाहीर करणार असल्याची माहिती आहे. काही ठिकाणी युती तर काही ठिकाणी आघाडी करत उद्धव ठाकरेंची शिवसेना राज्यातील महापालिका निवडणूक लढवेल, असे सांगितले जात आहे. काँग्रेसकडून सकारात्मक प्रतिसाद न आल्याने ठाकरे बंधू काँग्रेस सोडून युती जाहीर करण्याच्या तयारीत आहेत.
Comments are closed.