Shivaji Sawant BJP : शिवाजी सावंत यांचा भाजप प्रवेश का रखडला? कारण काय? ABP Majha
सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माझी संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत यांचा ठरलेला भाजप प्रवेश रखडल्याने नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. शिवाजीराव सावंत हे सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे मोठे नाव असून संपूर्ण जिल्ह्यात त्यांची मोठी ताकद असल्याने त्यांना भाजपमध्ये घेण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरू होते. याबाबत दोन दिवसापूर्वी पंढरपूर येथे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी शिवाजीराव सावंत यांची सविस्तर चर्चाही झाली होती. त्यानुसार दोन दिवसांपूर्वी सावंत यांचा भाजपमध्ये प्रवेश होईल अशी शक्यता असताना अचानक त्यांचा प्रवेश लांबणीवर पडल्याने नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.
शिवाजीराव सावंत हे माझे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे ज्येष्ठ बंधू असून सध्या सावंत कुटुंबात अंतर्गत वाद सुरू असल्याने शिवाजी सावंत यांनी एकनाथ शिंदे यांना सोडून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सर्व चर्चा अंतिम टप्प्यात आल्या असताना अचानक त्यांचा प्रवेश रखडल्याने यामागे त्यांचे धाकटे बंधू तानाजीराव सावंत यांचाच प्रभाव असल्याची चर्चा सुरू झाली आहे. राज्यात सत्तांतर घडताना तानाजीराव सावंत यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तानाजीराव सावंत यांच्या आग्रहाचा मान ठेवल्याची चर्चा सुरू झाली आहे. खरे तर दोन दिवसांपूर्वी पंढरपूर मध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पहिल्यांदा शिवाजीराव सावंत यांच्याशी सविस्तर चर्चा केली होती. यानंतर भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजीत शिंदे यांच्याशी वेगळी चर्चा करून पुन्हा तिघांची एकत्रित चर्चा झाली होती. यामुळे शिवाजीराव सावंत हे भाजपात जाणार हे जवळपास निश्चित ठरले होते. मात्र अचानक पुन्हा शिवाजीराव सावंत यांचा भाजप प्रवेश रखडल्याने यामागे तानाजीराव सावंत यांचाच हस्तक्षेप असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
Comments are closed.