Sanjog Waghere Join BJP : संजोग वाघेरे भाजपात प्रवेश करणार, मुंबईकडे रवाना
पिंपरी चिंचवड : भाजपने उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का दिला आहे. ठाकरेंनी मावळ लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरवलेले आणि पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष संजोग वाघेरेंना (Sanjog Waghere) भाजपने आपल्याकडे घेतलं आहे. आज मुंबईत प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत दुपारी बारा वाजता त्यांचा प्रवेश होईल. सोबत अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील काही माजी नगरसेवकांचा प्रवेश होईल, थोड्याचं वेळात ही नावं सर्वांना समजतील, असा दावा वाघेरेंनी (Sanjog Waghere) केला आहे. त्यांच्या पत्नी उषा वाघेरे प्रभाग क्रमांक 21 मधून भाजपच्या तिकिटावर लढणार आहेत. त्यामुळं प्रभाग 21 मधील इच्छुकांमध्ये नाराजी उफाळू शकते. ती नाराजी वरिष्ठ नक्की दूर करतील असा विश्वास वाघेरेंनी व्यक्त केला. (Sanjog Waghere)
ठाकरेंच्या सेनेचा राजीनामा दिलेले पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघरेंचा आज मुंबईत प्रवेश होण्याची शक्यता आहे. पिंपरीतून ते सकाळी 8 वाजता ते मुंबईकडे मार्गस्थ झाले आहेत. दुपारी 12च्या सुमारास हा प्रवेश होईल, अशी सूत्रांनी माहिती दिलीये.संजोग वाघेरे यांनी मावळ लोकसभेची निवडणूक ठाकरे सेनेकडून लढवली होती. वाघेरे यांना सहा लाख मतं मिळाली होती. मात्र शिंदे सेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यांचा पराभव झाला होता. 2029ची लोकसभा भाजपने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यास वाघेरे हे भाजपचे संभाव्य उमेदवार असू शकतात. तसेच वाघेरे यांच्या पत्नी अथवा मुलगा पिंपरी पालिकेची निवडणूक भाजपच्या तिकिटावर लढवू शकतात. संजोग वाघेरेंनी आजच्या भाजप प्रवेशाला दुजोरा दिलाय. मुंबईत प्रदेशाध्यक्ष रविंद चव्हाणांच्या उपस्थितीत हा प्रवेश होईल
Comments are closed.