Thackeray Brothers Unity | Raj Thackeray-Uddhav Thackeray भेटीवर Fadnavis, Raut, Shinde यांचे प्रत्युत्तर
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. या भेटीवरून देवेंद्र फडणवीस यांनी खोचक टीका केली होती. या टीकेला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राऊत म्हणाले की, “ठाकरे हे महाराष्ट्राचे शिल्पकार आहेत. शेलार आणि फडणवीस नाहीत, कारण ठाकर्यांची परंपरा या महाराष्ट्रात फार मोठी आहे. तशी शेलार फडणवीस यांची आहे का? अशी बाब नाही. ठाकरे हे कायम सुबुद्धी घेऊनच जन्माला आलेले असतात. आज शेलार असतील, फडणवीस असतील मुंबईमध्ये अभिमानाने वावरतायत ना ती ठाकरेंची कृपा हे त्यांनी मान्य केलं पाहिजे नाहीतर त्यांना कबुत्रं हाकायला गुजरातमध्ये जावं लागलं असतं.” एकनाथ शिंदे यांनी या भेटीवर सकारात्मक भाष्य केले. ते म्हणाले की, गणेश उत्सव आहे, दोघेही भाऊ एकत्र आहेत. कुठलेही कुटुंब एकत्र येत असेल तर चांगली गोष्ट आहे. त्याचा आनंद सगळ्यांना व्हायला पाहिजे. गणपती बाप्पाने सगळ्यांना सुबुद्धी द्यावी, सदबुद्धी द्यावी आणि त्याच्यातच सगळ्यांचे कल्याण आहे, अशी प्रार्थना त्यांनी केली.
Comments are closed.