Zero Hour Thackeray | ठाकरे ब्रँड म्हणजे दोन्ही ठाकरे की केवळ राज ठाकरे? शायना एनसी म्हणाल्या…
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीनंतर ‘ब्रँड ठाकरे’ आणि ‘ठाकरे बंधू’ एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू झाली. यावर ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे यांनी भाजप नेत्यांच्या भेटी घेतल्या तेव्हा ठाकरेंच्या शिवसेनेने या भेटींना ‘महाराष्ट्रद्रोह्यांना भेटणं’ असे म्हटले होते. आता मात्र सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला ‘सामान्य बाब’ म्हटले आहे. "देवेंद्रजी आमच्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत," असे सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केले. दीड महिन्यापूर्वी आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची बातमीही समोर आली होती. शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एचसी यांनी यावर बोलताना ‘ठाकरे ब्रँड’ फेल झाल्याचा दावा केला. "लोक ठाकरे किंवा गांधींच्या सरनेमवरती वोट नाही करत," असे शायना एचसी यांनी म्हटले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना मराठी माणूस आणि महाराष्ट्रासाठी काम करत असून, लोकांना प्रगतीचे राजकारण हवे आहे, असेही त्यांनी नमूद केले.
Comments are closed.