Uddhav Raj Thackeray Meet शिवतीर्थावर ठाकरे बंधूंची भेट, पालिका निवडणुकांसाठी रणनीती, अडीच तास चर्चा

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीचे एक कारण म्हणून, "उद्धवजींच्या मावशी, काकी यांनी निघताना उद्धवजींना सांगितलं होतं की गर्दीमधे आपल्याला बोलता आजार नाही बरं. तेव्हा तू परत ये मला भेटायला. आणि त्यानुसार मावशींना भेटायला, कुंडा मावशींना भेटायला, म्हणजे राजसाहेबांच्या आईना भेटायला आज उद्धवजी राजासाहेबांच्या घरी गेले आहेत." हे सांगितले गेले. गेल्या पंधरा दिवसांतील ही त्यांची दुसरी भेट असून, काही महिन्यांतील चौथी भेट आहे. आज दुपारी १२ वाजता उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी पोहोचले आणि अडीच तास चर्चा केली. या भेटीत पालिका निवडणुकांसाठी रणनीतीवर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईसह इतर महापालिका निवडणुकांवरही दोन्ही बंधूंमध्ये चर्चा झाली. युतीची चर्चा पुढे नेण्यासाठी दोन्ही पक्ष सकारात्मक असून, पुढील रणनीती ठाकरे बंधू ठरवणार आहेत. जागा वाटपाची जबाबदारी दोन्ही पक्षांच्या नेत्यांवर सोपवण्यात येईल. या भेटीमुळे महाविकास आघाडीच्या भवितव्यावरही चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेस नेत्यांसोबत राज ठाकरेंना सोबत घेण्याबाबत उद्धव ठाकरेंची आधीच चर्चा झाली होती. शरद पवारांचा पक्ष या युतीच्या बाजूने असल्याचेही समोर आले आहे. ठाकरेंची शिवसेना काही ठिकाणी महाविकास आघाडीसोबत, तर काही ठिकाणी मनसेसोबत किंवा स्वबळावर लढण्याची चाचपणी करू शकते.

Comments are closed.