Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात

Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात

राज्यातील 29 महापालिकांसाठी आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मात्र, काही महापालिकांमध्ये निवडणूक आयोगाच्या कारभारावरुन गोंधळ उडाला आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर निवडणूक आयोगाला काही प्रश्न विचारले आहेत. आता, उद्धव ठाकरेंनीही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आयोगाच्या कारभारावर अनेक सवाल केले आहेत. तसेच, देवेंद्र आणि चोर कंपनी हारली आहे म्हणून त्यांच्या पराभवाची कारण आम्ही शोधतोय. तर, मतदान केंद्रावर लावण्यात आलेली बोटावरील शाई पुसली जात नसून लोकशाही पुसली जात असल्याचंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं. मतदान काही नवीन विषय नाही, आता असा प्रश्न विचारायला गेला पाहिजे शाई पुसल्या गेली का? भाजप आणि मित्र पक्षांनी अनेक प्रयत्न केले आहेत. ईव्हीएम घोटाळा, मतदार यादी बरेच काही आहे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत मोबाईल दाखवत, बाईचं नाव रविंद्र असेल का? असा सवाल उपस्थित केला. भाजपच्या पाट्या मतदान केंद्रावर ठेवल्या जात आहेत, बोटावरची शाई पुसली जात आहे. निवडणूक आयोग आणि आयुक्त कसला पगार खात आहेत? महाराष्ट्रात 9 वर्षांनंतर निवडणूक होत आहेत. नवीन मतदार येतात-जातात, मात्र सुधारणा कसल्याही दिसत नाही. तुमच्याच माध्यमातून बातम्या येत आहेत, असे म्हणत मतदान प्रक्रियेत उडालेल्या गोंधळावरुन उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला.

Comments are closed.