Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा

Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा
मुंबईतील वरळीत भाजपविरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात तुफान राडा झाला.. वरळीतील सेंट रेजिस हॉटेलमध्ये दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने-सामने आले.. कामगार युनियनवरून दोन्ही पक्षातील कार्यकर्ते भिडले… त्यांनी युनियनचे बोर्ड फाडले.. आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.. भाजप नियमबाह्यरित्या संघटनेची नोंद करत असल्याचा आरोप करत ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी कामगार युनियनचे बोर्ड फाडून टाकले… पोलिसांनी मध्यस्थी करून दोन्ही बाजूंच्या आक्रमक कार्यकर्त्यांवर ताबा मिळवला.. दरम्यान काही दिवसांपूर्वी वांद्रे येथील ताज लँड हॉटेलमध्येही भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात असाच राडा झाला होता…
मुंबईत झालेल्या या राड्याची स्वत: मुख्यमंत्री फडणवीसांनीही दखल घेतलीय.. हॉटेल परिसरात राड करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा त्यांनी दिलाय..

आजच्या इतर बातम्या – 5 DEC 2025
३१ जानेवारीच्या पूर्वीच झेडपी आणि पालिकेच्या निडणुका घ्या, निवडणूक आयोगाला पुन्हा निर्देश…नगरपालिका,नगरपंचायतींची मतमोजणी २१ डिसेंबरलाच होणार, खंडपीठाच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचं शिक्कामोर्तब.
राज्यातल्या शिक्षकांचं शाळा बंद आंदोलन, ८० हजारांहून अधिक शाळांचे लाखो शिक्षक आंदोलनात सहभागी.. टीईटी परीक्षेची सक्तीसह २०२४ ची संच मान्यता रद्द करण्याची मागणी
राज्यातल्या महायुती सरकारची वर्षपूर्ती… आरक्षण, अतिवृष्टीसह लाडकी बहीण योजना गेल्या वर्षभरात चर्चेत, तर महायुतीत सुरू असलेल्या कुरघोड्यांमुळे राजकीय वर्तुळात चर्चा
फडणवीस सरकारचं एक वर्ष नाकर्तेपणाचं, वर्षभरात काय केलं यावर श्वेतपत्रिका काढा, विजय वडेट्टीवारांचं सरकारला आव्हान…

Comments are closed.