Vice President Election | उपराष्ट्रपतीपदाची रणधुमाळी, Delhi भेटीगाठींनी चर्चांना उधाण

दिल्लीत उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात मोठ्या घडामोडी घडत आहेत. भाजपने उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारासाठी जे पी नड्डा यांना सर्वाधिकार दिले आहेत. दुसरीकडे, इंडिया आघाडीमध्ये उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीवरून दोन मतप्रवाह असल्याची सूत्रांची माहिती आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासारख्या नेत्याला वाटते की, “आकडे नसल्यानं उमेदवारांची रिस्क घ्यायला नको.” तर काही नेत्यांचे म्हणणे आहे की, सरकारला मोकळी वाट देऊ नये. इंडिया आघाडीच्या आजच्या बैठकीत यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. या घडामोडींदरम्यान, खासदार सुप्रिया सुळे आणि पंतप्रधान मोदी यांची दिल्लीत भेट झाली, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यापूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही मोदींची भेट घेतली होती. सुप्रिया सुळे यांनी नॅशनल हँडलूम डे निमित्त भेट घेतल्याचे सांगितले, तसेच त्यांनी खर्गे आणि सोनिया गांधी यांचीही भेट घेतली. प्रियंका चतुर्वेदींच्या भेटीचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे. या दोन्ही खासदार ‘ऑपरेशन सिंदूर’ शिष्टमंडळाचा भाग होत्या.

Comments are closed.