Vidhan Bhavan Security | विधानभवनात राड्यानंतर कठोर नियम; Yellow Pass धारकांना प्रवेश नाही!
विधानभवनात काल झालेल्या राड्यानंतर आता सुरक्षा व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी हे कठोर नियम लागू करण्यात आले आहेत. यापुढे विधानभवनात कार्यकर्त्यांसाठी म्हणजेच अभ्यागतांसाठी प्रवेश बंद करण्यात आला आहे. Yellow Pass धारकांना आज विधानभवनात प्रवेश मिळणार नाहीये. Green Pass धारक सरकारी अधिकारी असतील तरच त्यांना प्रवेश दिला जाईल. इतर व्यक्तींना विशेष परवानगी पत्र घेऊनच विधानभवनात प्रवेश मिळेल. कालच्या घटनेनंतर विधानभवनात इतक्या कार्यकर्त्यांना पास कसे मिळाले, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. ABP Majha ने या संदर्भात काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. विधिमंडळात रोज किती पास दिले जातात? विधीमंडळाचे पास देण्यासाठी नियमांचे उल्लंघन केले जात आहे का? आमदारांच्या विधिमंडळात कार्यकर्त्यांचे काय काम आहे? सर्वपक्षीय आमदार कार्यकर्त्यांच्या प्रवेशासाठी एवढा आग्रह का धरतात? असे अनेक मुद्दे चर्चेत आले आहेत. सुरक्षा कार्यालयाकडून ही नवीन नियमावली आजपासून अमलात आणली आहे.
Comments are closed.