Vidhan Parishad Election Special Report : विधान परिषदेच्या रिंगणात बंडखोरांमुळे रंगत : ABP Majha
Vidhan Parishad Election Special Report : विधान परिषदेच्या रिंगणात बंडखोरांमुळे रंगत : ABP Majha
काही दिवसांपूर्वी एकतर्फी वाटणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत आता चांगलीच चुरस निर्माण झालीय. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी झालेल्या गोंधळाचा धुरळा आता हळूहळू खाली बसू लागलाय आणि विधान परिषद निवडणुकांसाठी अर्ज भरून झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आता बंडखोरांनी आपल्या भूमिका जाहीर करायला सुरुवात केलीय. अर्ज मागे घेण्यासाठी गुरुवारी दुपारी ३ वाजेपर्यंतची मुदत असली तरी अनेक बंडखोरांनी आपल्या बंडखोरीवर ठाम राहण्याचा निर्णय जाहीर केलाय. नांदेड मतदारसंघातून खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे पुत्र कृष्णा पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. मात्र ही उमेदवारी अपक्ष नसून महाविकास आघाडी पुरस्कृत असल्याचं सांगत आष्टीकरांनी या लढतीची चुरस वाढवलीय.इथून काँग्रेसच्या उमेदवारानंही अर्ज भरला असल्यामुळं माघारीच्या दिवशी नेमकं काय होणार, याची उत्सुकता वाढलीय. दुसरीकडं पूर्वीच्या निवडणुकीतले हिशेब चुकते करण्यासाठी स्थानिक नेत्यांनी कंबर कसल्याचेही संकेत मिळू लागलेत. आज दिवसभरात नेमकं काय घडलं, याचा आढावा घेऊया, या स्पेशल रिपोर्टमधून.
Comments are closed.