पोंगल आता जागतिक सण आहे: पंतप्रधान मोदी
केंद्रीय मंत्री मुरुगन यांच्या निवासस्थानी गोसेवा : निसर्गाच्या संरक्षणाबद्दल वक्तव्य
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी नवी दिल्लीत केंद्रीय राज्यमंत्री एल. मुरुगन यांच्या निवासस्थानी आयोजित पोंगल उत्सवात भाग घेत गेसेवा देखील केली आहे. पोंगल आता एक जागतिक सण ठरला आहे आणि तमिळ संस्कृती पूर्ण भारताचा संयुक्त वारसा आहे. पोंगल सण निसर्गाबद्दल आभार केवळ शब्दांपुरती मर्यादित असू नये, तर याला आमच्या दैनंदिन जीवनाचा हिस्सा करण्यात यावे हे शिकवित असल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत.
निसर्गाबद्दल आभार केवळ शब्दांपर्यंत मर्यादित राहू नयेत याकरता पोंगल सण आम्हाला प्रेरित करतो. पृथ्वी आम्हाला खूप काही देत असताना तिचे रक्षण करण्याची जबाबदारीही आमची आहे. भावी पिढ्यांसाठी मृदा आरोग्य राखणे, पाणी वाचविणे आणि साधनसामग्रीचा संतुलित वापर करणे सर्वात आवश्यक असल्याचे मोदींनी म्हटले आहे.
मागील वर्षी मला तमिळ संस्कृतीशी निगडित अनेक कार्यक्रमांमध्ये भाग घेण्याची संधी मिळाली. ही संस्कृती केवळ भारताचा नव्हे तर पूर्ण जगाचा वारसा आहे. तमिळ संस्कृतीत शेतकऱ्याला जीवनाची आधारशिला मानण्यात आले आहे. तिरुक्कुरलमध्ये कृषी आणि शेतकऱ्यांच्या महत्त्वावर विस्तृतपणे लिहिण्यात आले आहे. पोंगल सण निसर्गाचा सन्मान जीवनाचा हिस्सा करण्यासाठी प्रेरित असल्याचे वक्तव्य मोदींनी केले आहे.
तमिळ संस्कृतीतील समृद्ध परंपरा
तमिळ संस्कृती केवळ तामिळनाडूपुरती मर्यादित नाही, तर पूर्ण भारताचा संयुक्त वारसा आहे. पोंगल सारखे सण ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’च्या भावनेला मजबूत करतात असे म्हणत पंतप्रधानांनी देशभरात लोहडी, मकर संक्रांत, माघ बिहू यासारख्या सणांबद्दलच्या उत्साहाचे कौतुक करत तमिळ बंधूभगिनींना शुभेच्छा दिल्या आहेत.
तामिळनाडू सरकारचा निर्णय
पेंगल हा तमिळ समुदायासाठी सर्वात महत्त्वपूर्ण सणांपैकी एक आहे. हा सण निसर्ग, सूर्य, प्राणी अणि शेतकऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि परिवारासोबत संपन्नता, आभार आणि एकतेचे प्रतीक आहे. तामिळनाडू सरकारने या सणाच्या पार्श्वभूमीवर पात्र लाभार्थींसाठी एक किलो तांदूळ, एक किलो साखर आणि अन्य सामग्री वितरित करण्याचा निर्णय घेतला होता.
Comments are closed.