Poonam Gupta and Avnish Kumar’s wedding ceremony to be held at Rashtrapati Bhavan
देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रपती भवनात शहनाई चौघड्याचा आवाज घुमणार आहे. येत्या 12 फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती भवनात लग्न सोहळा पार पडणार आहे. वधू पूनम गुप्ता या केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) असिस्टंट कमांडंट म्हणून कार्यरत असून सध्या त्या राष्ट्रपती भवनात वैयक्तिक सुरक्षा अधिकारी (PSO) म्हणून कार्यरत आहेत.
नवी दिल्ली : देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रपती भवनात शहनाई चौघड्याचा आवाज घुमणार आहे. येत्या 12 फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती भवनात लग्न सोहळा पार पडणार आहे. वधू पूनम गुप्ता या केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) असिस्टंट कमांडंट म्हणून कार्यरत असून सध्या त्या राष्ट्रपती भवनात वैयक्तिक सुरक्षा अधिकारी (PSO) म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे लग्न सीआरपीएफचे असिस्टंट कमांडंट अवनीश कुमार यांच्याशी होणार आहे. अवनीश कुमार हे सध्या जम्मू आणि काश्मीरमध्ये सेवा देत आहेत. (Poonam Gupta and Avnish Kumar’s wedding ceremony to be held at Rashtrapati Bhavan)
सीआरपीएफ पूनम गुप्ता यांनी स्वतः राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासमोर राष्ट्रपती भवनात लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि त्यासाठी परवानगी मागितली होती. यानंतर द्रौपदी मुर्मू यांनी पूनम गुप्ता यांचा उत्कृष्ट रेकॉर्ड, त्यांची सेवा, शिस्त आणि कामावरील निष्ठा लक्षात घेऊन त्यांची ही अनोखी विनंती स्वीकारली आहे. तसेच पूनम गुप्ता यांची देशभक्ती, समर्पण आणि कार्यक्षमतेचे कौतुक करून राष्ट्रपतींनी त्यांना राष्ट्रपती भवनात लग्न करण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यानंतर आता या ऐतिहासिक लग्नाची तयारी सुरू झाली आहे.
हेही वाचा – Supreme Court : मोफत योजनांच्या खैरातीमुळे लोक काम करेनात, काय म्हणाले सर्वोच्च न्यायालय?
पूनम गुप्ता यांचे लग्न येत्या 12 फेब्रुवारी 2025 रोजी राष्ट्रपती भवनाच्या मदर तेरेसा क्राउन कॉम्प्लेक्समध्ये होणार आहे. दोन्ही कुटुंबांचे जवळचे नातेवाईक या सोहळ्याला उपस्थित राहतील. महत्त्वाचे म्हणजे नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि इतर काही खास पाहुणे देखील येतील.
कोण आहे पूनम गुप्ता?
पूनम गुप्ता यांचा जन्म मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात झाला आहे. त्यांचे वडील रघुवीर गुप्ता नवोदय विद्यालयात ऑफिस सुपरिटेंडेंट म्हणून काम करतात. पूनम यांनी गणित आणि इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. तसेच ग्वाल्हेरच्या जीवाजी विद्यापीठातून बी.एड. ची पदवीही त्यांनी मिळवली आहे. त्यांनी 2018 च्या यूपीएससी सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्स (सीएपीएफ) परीक्षेत 81 वा क्रमांक मिळवला आणि नंतर सीआरपीएफमध्ये असिस्टंट कमांडंट बनल्या. 2024 मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सीआरपीएफ महिला तुकडीचे नेतृत्व केल्यानंतर पूनम गुप्ता या प्रसिद्धीच्या झोतात आल्या.
हेही वाचा – Sunita Williams : अखेर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतणार; नासाने सांगितली तारीख
Comments are closed.