POP Ganesh idols be immersed peacefully on Tuesday Demand in Ganesh Mandal meeting
दरवर्षी माघी गणेशोत्सवानिमित्त जल्लोषात बाप्पाचं आगमन घराघरांत केलं जातं. मुंबईसह राज्यभरातील काही ठाराविक गणेश मंडळांमध्ये वर्षानुवर्षे बाप्पाची प्रतिष्ठापना केली जात आहे. मात्र, यंदा मुंबईतील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणपती बाप्पाचं आगमन करत बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना केली आहे. परंतु, या मंडळांवर आता नियमांचं सावट आलं आहे.
Maghi Ganeshotsav Ganpati Visarjan मुंबई : दरवर्षी माघी गणेशोत्सवानिमित्त जल्लोषात बाप्पाचं आगमन घराघरांत केलं जातं. मुंबईसह राज्यभरातील काही ठाराविक गणेश मंडळांमध्ये वर्षानुवर्षे बाप्पाची प्रतिष्ठापना केली जात आहे. मात्र, यंदा मुंबईतील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणपती बाप्पाचं आगमन करत बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना केली आहे. परंतु, या मंडळांवर आता नियमांचं सावट आलं आहे. कारण पीओपीच्या गणेशमूर्ती विसर्जित करता येणार नाहीत, असा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यामुळे मंगळवारी शांततेच्या मार्गाने गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढून पीओपीच्या मूर्ती विसर्जन करण्याची परवानगी देण्याची मागणी गणेश मंडळांनी केली आहे. (POP Ganesh idols be immersed peacefully on Tuesday Demand in Ganesh Mandal meeting)
माघी गणेशोत्सवानिमित्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 26 जानेवारीलाच गणेशमूर्ती मंडपात आणल्या होत्या. मात्र, मंडळात बाप्पाचं आगमन झाल्यानंतर पीओपीच्या गणेशमूर्ती विसर्जित करता येणार नाहीत, असा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यामुळे विसर्जनाच्या दिवशी मंडपाबाहेर काढलेल्या गणेशमूर्ती पुन्हा जागेवर ठेवण्याची वेळ गणेश मंडळांवर आली. परंतु, या गणेशमूर्ती वर्षभर मंडळात ठेवू शकणार नाही. त्यामुळे सरकारने येत्या मंगळवारी शांततेत विसर्जन करू द्यावे, अशी मागणी गणेश मंडळे आणि मूर्तिकार संघटनांच्या संयुक्त बैठकीत करण्यात आली.
गणेश मंडळाच्या मागण्या कोणत्या?
यासदर्भात रविवार (9 फेब्रुवारी) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची बैठक पार पडली. याबैठकीला मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार अनुपस्थित होते. या बैठकीत माघी गणेशोत्सवादरम्यान मुंबईतील मंडळांनी प्रतिष्ठापना केलेल्या पीओपीच्या गणेशमूर्तींचे शांततेत मंगळवारी विसर्जन करू द्यावे. कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता घ्यावी. राज्य सरकारने मूर्तिकार संघटनेचे म्हणणे आणि पीओपी गणेशमूर्तीमुळे पर्यावरणाचे नुकसान होत नाही ही बाजू भक्कमपणे न्यायालयात मांडावी. याशिवाय, पीओपी गणेशमूर्तींवर बंदी आणल्यास महाराष्ट्रातील सर्वात मोठा असलेला गणेशोत्सव बंद होईल. हजारो मूर्तिकार आणि कामगार रस्त्यावर येतील. त्यातून या उद्योगामुळे होणारी 70 ते 80 हजार कोटींची उलाढाल ठप्प होईल. त्यामुळे राज्य सरकारने मूर्तिकारांच्या व्यवसायावर येणारी गदा थांबवावी, अशा मागण्या करण्यात आल्या.
हेही वाचा – Maharashtra Politics : ठाकरे-फडणवीसांची तासभर बंद दाराआड चर्चा, पुन्हा होणार युती?
Comments are closed.