पोप फ्रान्सिस यांच्यावर अंत्यसंस्कार, रोममधील चर्चमध्ये दफन केले

मानवतेचा पुजारी अशी जगभरात ओळख निर्माण करणारे ख्रिस्ती धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे पार्थिव रोममधील सांता मारिया मॅगिओर बॅसिलिका येथे आज दफन करण्यात आले. हे ठिकाण सेंट पीटर्स स्क्वेअरपासून सुमारे 4 किमी अंतरावर आहे. पोप यांच्या अखेरच्या इच्छेनुसार, त्यांचे पार्थिव एका साध्या कबरीत दफन करण्यात आले, ज्यावर ‘फ्रान्सिस्कस’ (त्यांच्या फ्रान्सिस नावाचे लॅटिन रूप) असे लिहिले गेले. अंत्यसंस्कारावेळी जगभरातील लाखो लोकांची उपस्थिती होती.
Comments are closed.