‘या’ योजनेचा लाभ घ्या, 5 वर्षात 35 लाख रुपये मिळवा, जाणून घ्या सविस्तर माहिती
पोस्ट ऑफिस योजना: सध्या गुंतवणुकीसाठी (Investments) विविध योजना सुरु झाल्या आहेत. कमी काळात अधिक नफा मिळवून देणाऱ्या आणि तुमची ठेव पूर्णपणे सुरक्षीत असणाऱ्या विविध योजना आहेत. यामध्ये पोस्टाच्या देखील चांगल्या योजना आहेत. जर तुम्हाला जास्त जोखीम न घेता चांगली बचत करायची असेल आणि तुमच्या भविष्यासाठी दरमहा थोडीशी रक्कम गुंतवायची असेल, तर पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (RD) योजना तुमच्यासाठी योग्य पर्याय असू शकते. लहान किंवा मोठ्या मासिक ठेवी करुन, तुम्ही 5 वर्षांत 35 लाख रुपयांपर्यंत जमा करू शकता. त्यामुळं जे लोक गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक आहे, त्यांच्यासाठी ही योजना अत्यंत फायदेशीर आहे. कमी काळात अधिक पैसे मिळत असल्यामुळं तुमचा इन्कम सोर्स वाढवणारी ही योजना आहे.
कसे मिळणार पाच वर्षात 35 लाख रुपये
जर तुम्ही दरमहा 50000 रुपये गुंतवले तर तुमची एकूण ठेव 5 वर्षांत अंदाजे 30 लाखांपर्यंत पोहोचेल. याव्यतिरिक्त, 6.7 टक्के व्याजदरासह, तुम्हाला 5 वर्षांत अतिरिक्त 5.68 लाख मिळतील. याचा अर्थ असा की 5 वर्षांत तुमचे एकूण अंदाजे 35 लाख होतील. 10 वर्षांपेक्षा जास्त वयाचे अल्पवयीन मुले देखील त्यांच्या पालकांच्या मदतीने या योजनेअंतर्गत खाते उघडू शकतात. मूल 18 वर्षांचे झाल्यावर त्यांना नवीन केवायसी पूर्ण करावे लागेल. तुम्ही ते मोबाईल बँकिंग किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे देखील उघडू शकता, ज्यामुळे ते खूप सोपे आणि सोयीस्कर होईल.
दर महिन्याला दिलेल्या तारखेपर्यंत तुमचा मासिक हप्ता भरावा
तुम्ही दर महिन्याला दिलेल्या तारखेपर्यंत तुमचा मासिक हप्ता भरावा. जर खाते महिन्याच्या पहिल्या पंधरा दिवसांत उघडले असेल, तर पुढचा हप्ता 15 तारखेपर्यंत भरावा लागेल आणि जर तो नंतर उघडला असेल, तर तुम्ही 16 तारखेपासून शेवटच्या कामकाजाच्या दिवसापर्यंत हप्ता जमा करू शकता. यामुळे तुमची बचत नियमित आणि शिस्तबद्ध राहण्यास मदत होते. जर तुमचे खाते किमान एक वर्ष जुने असेल आणि तुम्ही 12 महिन्यांपासून नियमित ठेवी ठेवल्या असतील, तर तुम्ही तुमच्या ठेवीच्या 50 टक्के पर्यंत कर्ज घेऊ शकता. कर्जाच्या दरावर अतिरिक्त 2 टक्के व्याज आकारले जाते. तुम्ही कर्जाची परतफेड हप्त्यांमध्ये किंवा एकाच वेळी करू शकता, ज्यामुळे तुम्ही आपत्कालीन परिस्थितीतही सुरक्षित राहता.
महत्वाच्या बातम्या:
चांगला परतावा आणि सुरक्षित ठेव! ‘या’ योजनेत गुंतवणूक करा, 17 लाख रुपयांचा निधी मिळवा, जाणून घ्या सविस्तर माहिती
आणखी वाचा
Comments are closed.