रिक्त पदे भरणार, तीन महिन्यांत तक्रारी सोडवणार; लढाऊ कामगार सेनेला पालिकेचे आश्वासन

मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलातील दुय्यम अधिकारी, प्रमुख अग्निशामक ही पदे लवकरात लवकर भरण्यात येतील आणि कर्मचाऱयांच्या आस्थापनासंबंधित तक्रारी दोन ते तीन महिन्यांत सोडवण्यात येतील, असे ठाम आश्वासन अग्निशमन दल प्रमुख रवींद्र आंबुलगेकर यांनी अग्निशमन दल लढाऊ कामगार सेनेला आज दिले.

अग्निशमन दलातील कर्मचारी, कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आज म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने प्रमुख अग्निशमन दल अधिकारी आंबुलगेकर यांच्यासोबत निर्णायक बैठक घेतल्याची माहिती बाबा कदम यांनी दिली. यावेळी कार्याध्यक्ष प्रशांत तळेकर, अनिल खराटे, चिटणीस मिलिंद वळंजू, अफजल कागदी, खजिनदार दशरथ धनवट, उप चिटणीस पुष्कर शिंदे यांच्यासह यावेळी उपप्रमुख अग्निशमन अधिकारी सावंत, परब साहेब, पाटील, विभागीय अग्निशमन अधिकारी (दळणवळण)भोर, घाडीगांवकर आदी  उपस्थित होते.

अशा आहेत इतर मागण्या

z सेवानिवृत्त कर्मचाऱयांचे आर्थिक दावे दोन महिन्यांत निकाली काढणार.

z कर्तव्यावर असताना मृत्यू अथवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास एक  कोटी नुकसानभरपाई.

z भरती प्रक्रियेमध्ये कर्मचाऱयांच्या मुलांना पाच टक्के आरक्षण मिळावे.

z आयकार्डबाबत लवकरच प्रोसेस पूर्ण करून ते  देण्यात येतील.

z प्रशिक्षण विभागात प्रशिक्षक वर्गास विशेष भत्ता देण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात येईल.

z दिवंगत कर्मचारी सदाशिव धोंडीबा कार्वे यांच्या मृत्यूपश्चात वारसांना दिली जाणारी आर्थिक नुकसानभरपाई द्यावी.

z सेवानिवृत्त व कार्यरत कर्मचारी यांच्या सेवानिवासस्थानाच्या शिल्लक रकमेचा परतावा 15 ते दीड महिन्यात मिळेल.

z सर्व प्रवर्गातील मंजूर शेडय़ुल पोस्टमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. यामध्ये विशेष म्हणजे दुय्यम अधिकारी पदाच्या संख्येत 84 पदाची वाढ होणार आहे.

Comments are closed.