प्रभादेवीत भक्ती आणि शक्तीचा जागर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

शिवसेना शाखा 193 तर्फे भक्ती आणि शक्तीचा जागर करत विशेष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना शाखाप्रमुख संजय भगत आणि नगरसेविका हेमांगी वरळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, 28 मार्च रोजी सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत हा उत्सव पार पडणार असून या उत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रभादेवीच्या मुरारी घाग मार्ग येथील क्रिफ्टन टॉवर येथे हा उत्सव होणार आहे. हळदीपुंकू समारंभ, नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार, भक्तिगीते, महिला दिनानिमित्त शाखेतील महिलांकरिता विशेष कार्यक्रम, ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान असे विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. या कार्यक्रमासाठी उपविधानसभा संघटक सूर्यकांत बिर्जे, महिला उप विधानसभा संघटक रेखा देवकर, माजी शाखाप्रमुख लक्ष्मण भोसले, शाखाप्रमुख कीर्ती म्हस्के, शाखा समन्वयक गणेश देवकर, शाखा संघटक रत्नाकर चिरनेरकर, शाखा समन्वयक वैष्णवी पह्डकर, शाखा अधिकारी अक्षय सावंत, महिला युवा शाखा अधिकारी किरण सुनगर, शाखा समन्वयक सौरभ भगत यांनी विशेष मेहनत घेतली.

Comments are closed.