बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होऊ द्या, प्रफुल पटेलांचं आवाहन; म्हणाले, मी सगळ्यांशी बोललो, भे
प्रफुल्ल पटेल सुनेत्रा पवार बारामती विधानसभा निवडणूक 2026: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) आज बारामती पोटनिवडणुकीचा (Baramati Vidhan Sabha By Election 2026) उमेदवारी अर्ज भरणार आहेत. आज दुपारी 12.30 वाजता प्रफुल पटेल, सुनिल तटकरे, छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर महत्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत सुनेत्रा पवार अर्ज भरणार आहेत.
अर्ज भरण्याआधी सकाळी 9.30 सुनेत्रा पवार अजित पवारांच्या विद्या प्रतिष्ठान येथील स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन केले. यावेळी सुनेत्रा पवार भावूक झाल्याचे दिसून आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेलही (Praful Patel) आता बारामतीसाठी रवाना झाले आहेत. त्याआधी प्रफुल पटेल यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. यावेळी बारामतीची निवडणूक बिनविरोध होऊ द्या. हीच अजितदादांना खरी श्रद्धांजली असेल, असं विधान प्रफुल पटेल यांनी केलं. (Praful Patel On Sunetra Pawar)
प्रफुल पटेल काय म्हणाले? (Praful Patel On Baramati By Election 2026)
आमची अशी अपेक्षा होती की, अजितदादांच्या अकाली निधनानंतर बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी. माझी सगळ्या पक्षांना विनंती आहे की, बारामतीची निवडणूक बिनविरोध होऊ द्या. हीच अजितदादांना खरी श्रद्धांजली असेल, असं प्रफुल पटेल म्हणाले. तसेच मी सगळ्या पक्षांच्या पक्षश्रेष्ठींशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र ते प्रचारासाठी व्यस्त होते. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबतही बोलण्याचा प्रयत्न केला. मी भेटण्याचाही प्रयत्न केला, मात्र भेट होऊ शकली नाही, अशी माहिती प्रफुल पटेल यांनी दिली. परंतु मला खात्री आहे. आज ना उद्या सुनेत्रावहिनींची बिनविरोध निवड होईल, असंही प्रफुल पटेलांनी सांगितले.
बारामतीत काँग्रेसकडून आकाश मोरे यांना उमेदवारी- (Akash More Baramati Candidate)
अजित पवारांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे. कारण काँग्रेसने बारामतीच्या जागेवर आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ही निवडणूक जाहीर झाल्यापासूनच उमेदवार देण्यावर काँग्रेस ठाम होतं. बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी, असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही केलं होतं. मात्र, काँग्रेसने अखेर या ठिकाणी उमेदवार जाहीर केला. आकाश मोरे आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
बारामती विधानसभेसाठी 23 एप्रिलला मतदान- (Baramati By Election 2026)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुक होत आहे. बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी येत्या 23 एप्रिल रोजी मतदान होईल. त्यानंतर 4 मे रोजी बारामतीच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल.
सुनेत्रा पवार आज उमेदवारी अर्ज भरणार, VIDEO:
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.