भारताच्या अंतर्गत सुरक्षेसाठी 'प्रज्ञा'
गृह मंत्रालयाला सोपविली एआययुक्त उपग्रह प्रणाली
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताच्या अंतर्गत आणि सागरी सुरक्षेला आणखी मजबूत करण्याच्या दिशेने डीआरडीओने महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. याच्या अंतर्गत गृह मंत्रालयाला एक आधुनिक उपग्रह प्रणाली सोपविण्यात आली आहे, तर भारतीय नौदलासाठी एक खास एअर ड्रॉपेबल कंटेनरचे यशस्वी परीक्षण करण्यात आले आहे.
देशाच्या अंतर्गत सुरक्षा यंत्रणांना आणखी सक्षम अन् आधुनिक करण्यासाठी गृह मंत्रालयाला ‘प्रज्ञा’ नावाची स्वदेशी उपग्रह इमेजिंग प्रणाली सोपविण्यात आली आहे. गृह मंत्रालयाच्या कर्तव्य भवन-3मध्ये आयोजित एका सोहळ्यादरम्यान डीआरडीओचे सचिव समीर व्ही. कामत यांनी केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांना ही प्रणाली सोपविली.
डीआरडीओने विकसित केले
या अत्याधुनिक प्रणालीला डीआरडीओची प्रयोगशाळा सेंटर फॉर आर्टिफिशियल इंटेलिजेन्स अँड रोबोटिक्सकडून (सीएआयआर) पूर्णपणे भारतात विकसित करण्यात आले आहे. याची वैशिष्ट्या म्हणजे ही प्रणाली एआयवर आधारित आहे. सुरक्षा यंत्रणांना ही प्रणाली रियल-टाइम (तत्काळ) निर्णय घेण्यास महत्त्वपूर्ण सहाय्य प्रदान करणार आहे. देशाच्या संवेदनशील क्षेत्रांची देखरेख करणे आणि दहशतवादविरोधी अभियानांना यशस्वीपणे साकारण्यासाठी ही प्रणाली गेमचेंजर ठरणार अहे.
नौदलासाठी ‘एडीसी-150’चे यशस्वी परीक्षण
अंतर्गत सुरक्षेसोबत सागरी सीमांची सुरक्षा आणि मदतकार्यांना वेग देण्यासाठी डीआरडीओ आणि भारतीय नौदलाने संयुक्तपणे स्वदेशी एअर ड्रॉपेबल कंटेनर ‘एडीसी-150’च्या चार यशस्वी इन-फ्लाइट परीक्षणं केली आहेत. हे परीक्षण 21 फेब्रुवारी ते 1 मार्चदरम्यान गोव्यानजीकच्या समुद्रात विविध प्रतिकूल परिस्थितींमध्ये भारतीय नौदलाच्या पी8आय विमानाद्वारे करण्यात आले.
क्षमता आणि उद्देश
हा कंटेनर 150 किलोग्रॅमपर्यंत पेलोड (सामग्री/मदतसामग्री) आकाशातून पाडविण्यास (एअर-ड्रॉप) सक्षम आहे. याचा मुख्य उद्देश किनाऱ्यापासून दूर खोल समुद्रात अडकलेल्या नौदलाच्या नौकांपर्यत त्वरित प्रतिक्रियेच्या अंतर्गत तत्काळ वैद्यकीय सहाय्य, आवश्यक उपकरणे किंवा अन्नधान्य पोहोचविणे आहे. या प्रकल्पाला कमी कालावधीत पूर्ण करण्यासाठी अनेक संस्थांनी मिळून काम केले आहे.
नोडल लॅब : नौदल विज्ञान अन् तंत्रज्ञान प्रयोगशाळा (एनएसटीएल), विशाखापट्टणम
पॅराशूट सिस्टीमची निर्मिती : एरियल डिलिव्हरी रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टेब्लिशमेंट (एडीआरडीई), आग्रा
उड्डाण मंजुरी अन् प्रमाणन : सेंटर ऑफ मिलिट्री एअरवर्थिनेस अँड सर्टिफिकेशन (सीईएमआयएलएसी), बेंगळूर
उपकरण/इन्स्ट्रमेंटेशन सपोर्ट : संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळा (डीआरडीएल), हैदराबाद
वर्तमान स्थिती : याचे सर्व विकासात्मक उ•ाण परीक्षण यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले आहेत. लवकरच ही प्रणाली भारतीय नौदलाच्या ताफ्यात अधिकृतपणे सामील केली जाईल.
दहशतवादविरोधी अभियानांमध्ये मदत
प्रज्ञा या उपग्रहीय इमेजिंग प्रणालीमुळे गृह मंत्रालयाला तत्काळ निर्णय घेण्यास मदत मिळणार आहे. तसेच सुरक्षा यंत्रणांना संवेदनशील क्षेत्रांमध्ये
एडीसी-150 चा काय होणार लाभ?
-हा कंटेनर स्वत:सोबत 150 किलोग्रॅमपर्यंतची सामग्री म्हणजेच औषधे, सुटेभाग किंवा खाद्यपदार्थ नेऊ शकतो.
-या कंटेनरमुळे भारतीय नौदलाला योग्य वेळी आवश्यक वस्तूंचा संबधित ठिकाणी निर्धारित पुरवठा करता येणार आहे.
-नौदलाच्या नौका हजारो किलोमीटर अंतरावर खोल समुद्रात असताना त्यांच्यापर्यंत आवश्यक सामग्री पोहोचविणे अवघड असते.
-अशास्थितीत या कंटेनरच्या मदतीने विमानाद्वारे ही सामग्री थेट नौदलाच्या नौकांपर्यंत पोहोचविता येणार आहे.
Comments are closed.