Prajakta Mali rashmika mandanna Sapna Choudhary Events Politics in Parli says BJP MLA Suresh Dhas urk
बीड – सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड आणि परळीच्या विविध पॅटर्न राज्यात चर्चा होत आहे. त्यातच आता अभिनेत्री प्राजक्ता माली, रश्मिका मंदाना आणि हरियाणाची डान्सर सपना चौधरी या परळीमध्ये नेहमी येत असता. प्राजक्ता ताईंचा जवळचा पत्ता शोधायचा असेल तर तो परळीचा आहे, असं विधान भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी केले. आज सुरेश धस यांनी बीडचे नवे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेतली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
प्राजक्ता माळीचा जवळचा पत्ता परळी…
भारतीय जनता पक्षाचे आष्टी मतदारसंघातील आमदार सुरेश धस यांनी आज बीडचे नवीन पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेतली. या भेटीत मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आला याची माहिती घेतली. त्यासोबतच बीडमधील ‘आका’ सध्या कुठे आहे, याची माहिती दिली असेही ते म्हणाले.
– Advertisement –
बीडमधील ‘आका’कडे जिल्ह्यात 150 एकर जमीन आहे. त्या जमिनीवर कोट्यवधींचे बंधारे बांधण्यात आले आहेत. आकाकडे गेल्या पाच वर्षात एवढा पैसा आला कुठून? असा सवाल करत आमदार सुरेश धस म्हणाले की, बीडमध्ये इव्हेंट पॉलिटिक्सचा परळी पॅटर्न आहे. इव्हेंट पॉलिटिक्सचं कोणाला शिक्षण घ्यायचं असेल तर त्यानं परळीत आलं पाहिजे. आम्ही परळीत प्राजक्ता माळी, रश्मिका मंदाना आणि डान्सर सपना चौधरी यांना येताना पाहात असतो.
प्राजक्त माळी या नेहमी परळीत येत असतात. त्यांचा अतिशय जवळचा पत्ता हा परळी आहे, असा हा आमचा परळी पॅटर्न बघितला पाहिजे, असा मिश्लिल टोलाही त्यांनी कोणाचेही नाव न घेता लगावला.
– Advertisement –
इव्हेंट पॉलिटिक्स जर भविष्यात कोणाला करायचे असेल तर त्यांनी परळीत आले पाहिजे, असे सांगत आमदार सुरेश धस म्हणाले की, आमच्या परळीत सपना चौधरी, रश्मिका मंदना आणि प्राजक्ता माळी देखील येतात. प्राजक्ता माळींचा जवळचा पत्ता परळी असल्याचाही टोला त्यांनी लगावला.
सुरेश धसांनी सभागृहात सांगितला होता परळीचा पिक विमा माफिया पॅटर्न
आमदार सुरशे धस यांनी नुकत्याच झाले्लया हिवाळी अधिवेशनात बीड जिल्ह्यात परळीमध्ये पीकविमा माफिया असल्याचे सांगत हा परळीचा नवा पॅटर्न असल्याचे म्हटले होते. या पॅटर्नची माहिती पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री यांनाही देणार असल्याचे ते म्हणाले होते. परळीमधील पीकविमा माफिया हे आसपासच्या तालुक्यात आणि लातूर परभणी जिल्ह्यातही एक रुपयात पीकविमा भरतात आणि शासनाकडून कोट्यवधी रुपये लाटत असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला होता.
हेही वाचा : Suresh Dhas : आमदार सुरेश धस यांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट; मंत्री धनंजय मुंडेंना म्हणाले…
Edited by – Unmesh Khandale
Comments are closed.