महात्मा फुले योजनांचे पॅकेजस वाढवून दिलंय, लूटमार करणाऱ्या रुग्णालयांची माहिती द्या, झटक्यात का

प्रकाश आबिटकर: राज्यातील खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्णांकडून आकारल्या जाणाऱ्या अवाजवी शुल्काचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्यात आला. या चर्चेदरम्यान आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांनी महात्मा फुले योजनांचे (Mahatma Phule Yojana) पॅकेजस वाढवून दिले आहे. लूटमार करणाऱ्या रुग्णालयांची माहिती द्या, आम्ही कारवाई करु, असे ठणकावून सांगितले. तसेच,राज्यातील सर्व खाजगी रुग्णालयांनी उपचारांचे दरपत्रक रुग्णांना सहज दिसेल अशा ठिकाणी लावणे बंधनकारक आहे. मात्र उपचारांसाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्कावर कोणतीही कमाल किंवा निश्चित मर्यादा नाही, अशी कबुली त्यांनी लेखी उत्तरात दिली आहे.

विधानसभेत या संदर्भात काँग्रेस नेते नाना पटोले यांनी प्रश्न उपस्थित करत महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि पंतप्रधान जनआरोग्य योजना यांचा एकत्रित लाभ रुग्णांना मिळण्यासाठी सरकार काय उपाययोजना करणार, असा सवाल केला. तसेच या योजनांअंतर्गत उपचार मिळत असतानाही काही रुग्णालयांकडून रुग्णांकडून अतिरिक्त पैसे घेतले जात असल्याच्या अनेक तक्रारी असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

Prakash Abitkar: रुग्णालयांवर आम्ही कारवाई करतोय

यावर उत्तर देताना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, रुग्णालयांवर आम्ही कारवाई करतोय. जिल्हा पालकमंत्री, लोकप्रतिनिधी आणि आमदार यांच्या समावेशाने एक समिती स्थापन करण्यात आली असून ती दर तीन महिन्यांनी आढावा घेते. कुठेही गैरप्रकार आढळल्यास सरकार कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Sunil Prabhu: ऑपरेशनच्या वेळी रुग्णांची लूट

आमदार सुनील प्रभू म्हणाले की, आरोग्य योजना असेल, योजना बसवली जाते आणि नातेवाईकांना अतिरिक्त पैसे मागितले जातात. तिथे बोर्ड लावा, तक्रार असेल तर कारवाई व्हायला पाहिजे. ऑपरेशनच्या वेळी रुग्णांची लुट केली जाते. नातेवाईकांना त्रास होतो, पैसे घेतले जातात. बोर्ड लावणार आहात. कोऑर्डिनेटर कोण आहेत? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Prakash Abitkar: महात्मा फुले योजनांचे पॅकेजस वाढवून दिलंय

यावर प्रतिक्रिया देताना आरोग्यमंत्री आबिटकर म्हणाले की, या योजनेत एक पैसा घेतला तर तात्काळ कारवाई आम्ही करतोय. रुग्णालयांना पॅकेजेस वाढवून देण्यात आली आहे. एक चूक झाली तरी आम्ही कारवाई करणार आहोत. आमदारांनी आपल्या मतदारसंघातही योजनेचा आढावा घ्यावा. जर चूक असेल तर तात्काळ आम्ही कारवाई करणार, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

Mahatma Phule Yojana: पांढऱ्या रेशन कार्ड धारकांनाही महात्मा फुले योजनेचा लाभ

यावेळी आमदार बबनराव लोणीकर यांनी आयुष्मान भारत योजनेच्या अंमलबजावणीबाबत प्रश्न उपस्थित करत सांगितले की, आयुष्यमान भारत योजना आणली. बायपास करायची असेल तर 6 लाख रुपये लागतात. मात्र, केवळ 1 लाख रुपये दिले जात आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून प्रत्येकी तीन लाख रुपये येतात, असे त्यांनी म्हटले. यावर स्पष्टीकरण देताना आरोग्यमंत्री आबिटकर यांनी सांगितले की, कोणतेही पैसे द्यायचे नसतात. आपण प्रभावी पणे जनआरोग्य योजना राबवतोय. महात्मा फुले योजना ही पांढऱ्या रेशन कार्ड असणाऱ्यांना देखील आहे. अशात सर्वांनी ह्या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

Prakash Abitkar: अधिवेशन काळात अनावश्यक बैठका घेणे अनपेक्षित

दरम्यान, आमदार रणधीर सावरकर यांनी अधिवेशन काळात अधिकारी अकोल्यात बैठका घेत आहेत. अपेंडिक्सचा यात समावेश करणार का? असा सवाल उपस्थित केला. यावर आरोग्यमंत्री आबिटकर यांनी अधिवेशन काळात अनावश्यक बैठका घेणे अपेक्षित नसल्याचे स्पष्ट केले. तसेच बहुतेक आजारांचा समावेश योजनेत असून हरनिया, अपेंडिक्स आणि हिप जॉइंटसंदर्भात खासगी रुग्णालयांबाबत विचार केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

आणखी वाचा

LPG e-KYC: घरगुती गॅस ग्राहकांसाठी e-KYC अनिवार्य, प्रक्रिया न केल्यास सबसिडी मिळणार नाही; जाणून घ्या, संपूर्ण प्रोसेस

आणखी वाचा

Comments are closed.