लोकं एवढे मूर्ख नाहीत, हॉल तिकीटवर जातीच्या उल्लेखाप्रकरणी प्रकाश आंबेडकरांची शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यावर टीका
दहावी बारावीच्या हॉल तिकीटावर जातीचा उल्लेख करण्यात आला होता. त्यावरून गदारोळ झाल्यानंतर हा निर्णय मागे घेतला गेला. पण एखाद्या विद्यार्थ्याला पास की नापास करण्यासाठी घेतलेला निर्णय आहे का असा सवाल वंचित बहुजन आघीडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी विचारला आहे. तसेच लोक एवढे वेडे नाहीत असेही आंबेडकर म्हणाले.
एक्सवर पोस्ट करून प्रकाश आंबेडकर म्हणाले की, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे महोदय, एकदा Law Department ला विचारून घ्या की, परीक्षेच्या हॉल तिकिटाची कायद्याची वैधता किती आहे आणि शाळेच्या शाळा सोडण्याच्या दाखल्याची किती आहे ? जनता आपल्याला उगीचच वेड्यात काढेल असे स्टेटमेंट देऊ नका. हा एक नवीन प्रकार आहे की, कोणत्या विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्तीर्ण करायचे आणि कोणाला नापास करायचे.
70च्या दशकात तोंडी परीक्षेत विद्यार्थ्यांच्या पाठीवर थोपटतांना चाचपून निर्णय घेतला जात होता की, याला पहिल्या प्रयत्नात पास करायचे की 3-4 प्रयत्न करायला लावायचे. ही तीच पद्धत नव्याने आणताय. बाटली बदलली तरी दारू तीच आहे. दारूच्या वासाने कुठली दारू आहे हे कळते. तेव्हा तुमचे आताचे धोरण म्हणजे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांची जात हॉल तिकिटावर आणून तुम्ही काय करू बघताय, हे लोकांना कळतं. लोकं एवढे मूर्ख नाहीत असेही आंबेडकर म्हणाले.
शालेय शिक्षणमंत्री @dadajibhuse महोदय, एकदा Law Department ला विचारून घ्या की, परीक्षेच्या हॉल तिकिटाची कायद्याची वैधता किती आहे आणि शाळेच्या शाळा सोडण्याच्या दाखल्याची किती आहे ?
जनता आपल्याला उगीचच वेड्यात काढेल असे स्टेटमेंट देऊ नका. हा एक नवीन प्रकार आहे की, कोणत्या… pic.twitter.com/gj3UDXt0xl
— प्रकाश आंबेडकर (@Prksh_Ambedkar) 18 जानेवारी 2025
Comments are closed.