Prakash Ambedkar feels there is a lack of political will to take action against Pakistan


सरकार पाकिस्तानवर कोणतीही कारवाई करो, आम्ही त्यांच्यासोबत आहोत, असे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. मात्र असे वक्तव्य करतानाच प्रकाश आंबेडकर यांनी पाकिस्तानवर कारवाईसाठी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याचे मतही त्यांनी मांडले आहे.

मुंबई : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. पाकिस्तानवर कारवाई करण्यासाठी विरोधकही केंद्र सरकारला पाठिंबा देताना दिसत आहेत. अशातच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारला पाठिंबा दिला आहे. सरकार पाकिस्तानवर कोणतीही कारवाई करो, आम्ही त्यांच्यासोबत आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. मात्र असे वक्तव्य करतानाच प्रकाश आंबेडकर यांनी पाकिस्तानवर कारवाईसाठी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याचे मतही त्यांनी मांडले आहे. (Prakash Ambedkar feels there is a lack of political will to take action against Pakistan)

माध्यमांशी संवाद साधताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी वाटप करार रद्द करण्याची घोषणा केली आहे आणि त्यासाठी पाकिस्तानला एक पत्र पाठवलं आहे. त्यामुळे आपल्या देशात चर्चा आहे की, पाकिस्तानला जाणारं पाणी आता अडवलं जाणार आणि पाकिस्तानची कोंडी केली जाणार. मात्र पाकिस्तानला जे पत्र पाठवण्यात आलं आहे, त्यामध्ये पाणी थांबवलं आहे आणि थांबवणार आहोत असे कुठेही म्हटलेले नाही. त्या पत्रात जी भाषा वापरली आहे, त्यावरून ठोस असं काहीच समोर येत नाही. लोकांना यातील सत्य परिस्थिती माहिती नाही. त्यामुळे सिंधू पाणी वाटप कराराबाबत सत्य परिस्थिती समोर आली पाहिजे, अशी मागणी आंबेडकर यांनी केली.

हेही वाचा – Rohit Pawar : गायकवाडांनंतर रोहित पवारांचे पोलिसांवर गंभीर आरोप; नेरुळ ड्रग्ज प्रकरणावर केलं भाष्य

सरकारच्या कारवाईला पाठिंबा देण्यासाठी आम्ही 2 मे रोजी मुंबईतील हुतात्मा स्मारक येथे निदर्शने करणार आहोत, अशी माहिती देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, पाकिस्तानवर कारवाई करण्यासाठी लष्कर तयार आहे. पण राजकीय नेतृत्व त्यासाठी तयार नाही. त्यामुळे त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी आणि सत्ताधाऱ्यांना निर्णय घेण्याची ताकद देण्यासाठी आम्ही हुतात्मा स्मारक येथे आंदोलन करणार आहोत. तसेच जर सरकारला वाटलं की, युद्धासाठी तिजोरीमध्ये पैसे नाहीत, तर आम्ही त्यासाठी निधी उभारू, असेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रध्वजाच्या खाली सर्वपक्षीयांनी एकत्र यावे

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, पाकिस्तानवर कारवाई करण्यासाठी सरकारचे मनोबल वाढावे यासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत. या आंदोलनात सर्व पक्षीयांना सहभागी होण्याचं आम्ही आवाहन करतो. केंद्र सरकारने घेतलेला निर्णय आम्हाला मान्य असेल, हा संदेश देण्यासाठी आम्ही आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आम्ही राष्ट्रध्वजाच्या खाली एकत्र येणार आहोत, अशई माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

हेही वाचा – Omar Abdullah: …काश्मीरमधील दहशतवादाच्या अंताची सुरुवात; काय म्हणाले जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री?



Source link

Comments are closed.