Prakash Ambedkar questions Modi as Pahalgam terror attack attackers still unaccounted for


मुंबई : मागील महिन्यात 22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममधील बैसरन येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एका स्थानिक नागरीकासह 25 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या घटनेवर देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला. केंद्र सरकारने 15 दिवसांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरच्या 9 दहशतवादी तळांवर एअर स्ट्राइक केला. यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. सध्या दोन्ही देशात युद्धविराम झाला असला तरी पहलगाम घटनेतून देश सावरण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र हा हल्ला करणारे हल्लेखोर अद्यापही सापडलेले नाहीत. याचपार्श्भूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना महिना उलटला तरी दहशतवादी कुठे आहेत? असा सवाल विचारला आहे. (Prakash Ambedkar questions Modi as Pahalgam terror attack attackers still unaccounted for)

प्रकाश आंबेडकर यांनी ट्वीट करताना म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, पहलगाम दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार असलेले दहशतवादी कुठे आहेत? पहलगाम घटनेला जवळजवळ एक महिना झाला आहे. तुम्ही नेमका जल्लोष कसला साजरा करत आहात? त्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पीडितांच्या पत्नींना अद्याप न्याय मिळालेला नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. त्यांनी आणखी एक ट्वीट करताना म्हटले की, 56 इंचाच्या छातीचे तथाकथित विश्वगुरू, तुमचे लक्ष देशाच्या सुरक्षेवर आहे की निवडणूक प्रचारावर? असा प्रश्नही प्रकाश आंबेडकर यांनी विचारला आहे.

हेही वाचा – Narkatla Swarg Book : गृहमंत्रीपदासाठी माझा विचार करताना त्यांना भीती वाटली असेल; मुश्रीफ यांचा पवारांवर निशाणा

पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरच्या पोलिसांनी सांगितले होते की, 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दोन पाकिस्तानी आणि दोन काश्मीरी नागरीकांचा सहभाग आहे. केंद्र सरकारने या हल्लेखोरांना पकडण्याची जबाबदारी राष्ट्रीय तपास यंत्रणेवर (NIA) सोपवली आहे. ही तपास यंत्रणा गेल्या महिनाभरापासून पहलगाममधील हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. मात्र अद्यापही चारपैकी एकही हल्लेखोर सापडलेला नाही. त्यामुळे दहशतवादी अजूनही काश्मीरमध्येच आहे का? दहशतवाद्यांना पकडणे तपास यंत्रणेसाठी आव्हानात्मक का ठरत आहे? तसेच तपासातून नक्की काय माहिती समोर आली आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

हेही वाचा – Sharad Pawar : शिष्टमंडळावरून राजकारण नको, शरद पवारांचा संजय राऊतांना सल्ला





Source link

Comments are closed.