'प्रलय' लवकरच सशस्त्र दलात सामील होणार आहे
संरक्षण मंत्रायलयाकडून माहिती : डीआरडीओकडून क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, चांदीपूर
‘प्रलय’ क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीद्वारे भारताने पुन्हा एकदा स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाची ताकद दाखवून दिली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) नुकतीच ओडिशाच्या किनाऱ्याजवळील चांदीपूर येथील डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावरून या अत्याधुनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. यशस्वी चाचणीमुळे हे क्षेपणास्त्र आता लष्कराच्या ताफ्यात दाखल होण्यास सुसज्ज होत असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली.
प्रलय हे 500 ते 1,000 किलोग्रॅम पेलोड क्षमतेचे एक कमी पल्ल्याचे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. ‘डीआरडीओ’ने विकसित केलेले हे क्षेपणास्त्र पारंपरिक युद्धसामग्री वाहून नेण्यास सक्षम असून ते 150 ते 500 किलोमीटरच्या अंतरावरील लक्ष्यांवर मारा करू शकते. यात प्रगत मार्गदर्शन आणि दिशादर्शन तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे ते लक्ष्यांवर अचूकपणे मारा करण्यास मदत करते. हे क्षेपणास्त्र विविध प्रकारची पारंपरिक युद्धसामग्री वाहून नेण्यास सक्षम आहे. त्याचे अर्ध-क्षेपणास्त्र तंत्रज्ञान त्याला आधुनिक सामरिक शस्त्रांच्या श्रेणीत विशेष स्थान देते. या यशस्वी चाचणीनंतर हे क्षेपणास्त्र आता लवकरच सैन्यात दाखल केले जाऊ शकते.
संरक्षणमंत्र्यांनी केले कौतुक
डीआरडीओने ओडिशाच्या किनाऱ्याजवळ स्वदेशी बनावटीच्या ‘प्रलय’ क्षेपणास्त्राची यशस्वी उ•ाण चाचणी घेतली. ही चाचणी ‘वापरकर्ता मूल्यांकन चाचण्यां’तर्गत घेण्यात आल्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी जाहीर केले. चाचणीदरम्यान क्षेपणास्त्राने निर्धारित केलेले सर्व निकष यशस्वीरित्या पूर्ण केले. ही यशस्वी चाचणी भारताची स्वदेशी संरक्षण क्षमता मजबूत करण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण यश आहे. संरक्षण सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष राजेश कुमार सिंह यांनी यशस्वी उ•ाण चाचणीत सहभागी असलेल्या पथकांचे अभिनंदन केले.
वेग आणि दिशा बदलण्याची क्षमता
प्रलय क्षेपणास्त्र कमाल मॅक 6.1 इतका वेग गाठू शकते. या उच्च वेगामुळे क्षेपणास्त्र प्रक्षेपित झाल्यानंतर शत्रूला प्रतिक्रिया देण्यासाठी खूप कमी वेळ मिळतो. शिवाय, त्याच्या रचनेत त्याच्या उ•ाणमार्गाची मोठी भूमिका असते. पारंपरिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रs सामान्यत: एका निश्चित, उंच मार्गाचे अनुसरण करतात. याउलट, प्रलय क्षेपणास्त्र कमी उंचीवर उडते आणि हवेत असताना आपली दिशा बदलू शकते. या अर्ध-बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची आपला मार्ग बदलण्याची क्षमता त्याच्या मार्गाचा अंदाज लावणे कठीण करते. यामुळे शत्रूच्या रडार आणि हवाई संरक्षण प्रणालींना क्षेपणास्त्राचा मागोवा घेणे किंवा त्याला रोखणे अत्यंत कठीण असल्यामुळे ते शत्रूराष्ट्रासाठी घातक ठरणार आहे.
Comments are closed.