Praniti Shinde expressed regret over caste politics in Maharashtra Elections 2024
मागील वर्षी राज्यात विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. त्यावेळी सर्वाधिक पाहायला मिळाले ते जातीय राजकारण. याच जातीय राजकारणाच्या मुद्द्यावरून सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी खंत व्यक्त केली आहे.
सोलापूर : मागील वर्षी राज्यात विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. त्यावेळी सर्वाधिक पाहायला मिळाले ते जातीय राजकारण. याच जातीय राजकारणाच्या मुद्द्यावरून सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी खंत व्यक्त केली आहे. सोलापुरात खासदार प्रणिती शिंदे यांनी एका विकासकामाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला. या संवादातूनच त्यांनी खंत व्यक्त करत मला आज या देशाबद्दल वाईट वाटत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच, नागरिकांनी कामाला नाही, तर जातीला मतदान केले, असे म्हणत खासदार शिंदेंनी आपल्या मनातील खंत व्यक्त केली आहे. (Praniti Shinde expressed regret over caste politics in Maharashtra Elections 2024)
सोलापुरातील एका कार्यक्रमात खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, तुम्ही कामाला मतदान केले नाही, याचे मला वाईट वाटले. कारण ही मातृभूमी सगळ्यांची आहे. या मातृभूमीने केव्हाच भेदभाव केला नाही. मिनी इंडिया, छोटा भारत कुठे आहे माहिती आहे? इकडे शास्त्रीनगर मध्ये बघा आजूबाजूला. मी आज सकाळी मोहोळ तालुक्यातल्या मुंढेवाडी गावात जाऊन आले, या गावात शंभर टक्के मराठा राहतात. मराठा म्हणजे हिंदूं ना? पण त्या मुंढेवाडीत ग्रामदैवत कोण आहे माहितीय? दर्गा आहे… बीबी फातिमाची. पण तेथील सर्व हिंदू लोक म्हणतात, या देवामुळेच आमचे गाव चांगे आहे. त्या गावात हिंदू-मुस्लीम न करता प्रत्येक धर्माचा आदर-सन्मान केला जातो, असेही यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून सांगण्यात आले.
हेही वाचा… Ajit Pawar : अजितदादांची दिल्लीत वेगळी चूल; विधानसभेसाठी 30 उमेदवारांची यादी जाहीर, 13 मुस्लिम
तसेच, मी असे खूप ठिकाणी बघितले आहे, गाव पूर्ण मुस्लिम आहे आणि गावात देव-देवी आहेत, ज्यांना सगळे मानतात. आपण कधीही भेदभाव केला नाही. आज निवडणुका नाही, पण मला आपल्याशी बोलावेसे वाटत आहे. मला माफ करा, मी बोलू की नको बोलू? असा प्रश्नही त्यांनी उपस्थितांना विचारला. त्या म्हणाल्या की, कारण का मला वाईट वाटते, मी देशासाठी काम करते, मी कोणत्या एका धर्मासाठी किंवा समाजासाठी काम करत नाही. जे गरीब आहेत त्यांच्यासाठी मी काम करते. फक्त सोलापूर नाही, आज मला या देशाचा वाईट वाटत आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत मला देशाचे वाईट वाटत आहे, असे म्हणत खासदार प्रणिती शिंदे यांनी जातीय राजकारणावरुन खंत व्यक्त केली.
Comments are closed.