प्रशांत किशोरने 65 उमेदवारांची घोषणा केली
जनसुराज्य पक्षाची दुसरी यादी जाहीर
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांच्या जन सुराज्य पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. सोमवारी जाहीर झालेल्या यादीत 65 उमेदवारांचा समावेश आहे. यापूर्वी पक्षाने आपल्या पहिल्या यादीत 51 उमेदवारांची घोषणा केली होती. आतापर्यंत पक्षाने एकूण 116 उमेदवारांची घोषणा केली आहे. पाटणा येथील पत्रकार परिषदेत उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली असून त्यामध्ये सामाजिक समतोल सांभाळण्यात आल्याचे दिसत आहे. दुसऱ्या यादीत अभयकांत झा भागलपूरमधून उमेदवार असतील. डॉ. शाहनवाज बरहरियामधून निवडणूक लढवतील. नीरज सिंह यांना शिवहरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. नरकटियामधून लाल बाबू यादव, कल्याणपूरमधून मंतोष साहनी, संदेशमधून राजीव रंजन सिंह, बाजपट्टीमधून आझम अन्वर हुसेन, हरलाखीमधून रत्नेश्वर ठाकूर, नरपतगंजमधून जनार्दन यादव आणि इस्लामपूरमधून तनुजा कुमारी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
Comments are closed.