भाजपकडून प्रस्ताव आल्यास चर्चेसाठी तयार, नाहीतर स्वबळावर, राष्ट्रवादीच्या आमदाराचं वक्तव्य


प्रताप पाटील चिखलीकर नांदेडमध्ये (Nanded) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती होणार की नाही याबाबत संभ्रम आहे. मित्र पक्षांनी तयारी दाखवली तर चर्चा करु असं भाजपा नेते खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan)  म्हणाले. त्यावर अशोक चव्हाण यांचे राजकीय विरोधक आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी प्रतिक्रीया दिली आहे. चिखलीकर हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आहेत. महायुतीत भाजपा मोठा भाऊ आहे. मोठ्या भावाने युतीसाठी प्रस्ताव दिला तर आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, असं आमदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणालेत. महायुती तुटू नये ही माझी भावना आहे, जर जमलं नाही तर आमची स्वबळाची तयारी आहे असं चिखलीकर म्हणाले.

प्रताप पाटील चिखलीकर काय म्हणाले?

आज सत्तेमध्ये भाजप हामोठा भाऊ म्हणून काम करत असल्याचे प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले. जेव्हा चर्चा करायची असते तेव्हा मोठ्या भावाकडून प्रस्ताव येणं अपेक्षीती असल्याचे चिखलीकर म्हणाले. आणचीतयारी आहे. महायुती तुटू नये ही माझी भावना आहे. जर समजा जमलं नाहीतर आमची स्वबळावर लढण्याची तयारी असल्याचे चिखलीकर म्हणाले. महायुतीचा प्रस्ताव आला तर दोन पावले आम्ही मागे सरकू झालं नाहीतर आमची तयारी असल्याचे चिखलीकर म्हणाले.

अशोक चव्हाण काय म्हणाले?

युतीच्या संदर्भात भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  मित्र पक्षांनी तयारी दाखवली तर चर्चा करु असे मत भाजपा नेते खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan)  यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळं आता नांदेडमध्ये युती होणार की भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

महत्वाच्या बातम्या:

Pratap Patil Chikhlikar: मी 18 पैकी 16 निवडणुका जिंकल्या; मागच्या दाराने कधीच गेलो नाही, माझे वडील काही मंत्री नव्हते, ना खासदार होते, चिखलीकरांची अशोक चव्हाणांवर टीका

आणखी वाचा

Comments are closed.