Pratap Sarnaik decided to run pod taxis in Thane and Mira-Bhayander as well


नागरिकांची ट्रॅफिकमधून सुटका लंडनच्या हिथरो एअरपोर्टच्या धर्तीवर पॉड टॅक्सी सेवा बीकेसीमध्ये चालवण्याचा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गेल्या महिन्यात घेतला होता. यानंतर आता ठाणे आणि मीरा-भाईंदर मध्येही पॉड ट्रॅक्सीची संकल्पना राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

मुंबई : नागरिकांची ट्रॅफिकमधून सुटका लंडनच्या हिथरो एअरपोर्टच्या धर्तीवर पॉड टॅक्सी सेवा बीकेसीमध्ये चालवण्याचा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गेल्या महिन्यात घेतला होता. यानंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने (MMRDA) वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स म्हणजेच बीकेसीमध्ये स्वयंचलित पॉड टॅक्सी सेवा सुरू करण्याला मान्यता दिली आहे. यानंतर आता ठाणे आणि मीरा-भाईंदर मध्येही पॉड ट्रॅक्सीची संकल्पना राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. आज महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थित प्रताप सरनाईक यांच्यासमोर पॉड टॅक्सी प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. (Pratap Sarnaik decided to run pod taxis in Thane and Mira-Bhayander as well)

रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी येत्या काळात हवाई वाहतूक सुरू करणे आवश्यक आहे. याकरिता प्रायोगिक तत्त्वावर पॉडटॅक्सीचा प्रकल्प ओवळा माजिवडा मतदारसंघात राबवण्यात येणार आहे. या संदर्भातील बैठक ठाणे महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात घेण्यात आली. या बैठकीत पॉडटॅक्सीचे सादरीकरण करण्यात आले. तसेच मिरा भाईंदर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ते घोडबंदर आणि भाईंदर पाडा ते विहंग हिल्सपर्यंतही पॉडटॅक्सी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा – Ambadas Danve : विरोधी पक्षनेतेपदावर आमचाच दावा, समर्थनाचा प्रश्नच नाही; दानवे काय म्हणाले?

ठाणे महानगरपालिका आणि मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प ओवळा माजिवडा मतदारसंघात होत आहे, याचा अत्यंत आनंद आहे. या प्रकल्पामुळे घोडबंदर परिसरातील वाहतूक कोंडी नक्कीच कमी होईल, असा विश्वास प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.

पॉड टॅक्सीत 16 प्रवाशांची क्षमता

पॉड टॅक्सीतून एकावेळेस उभे आणि बसून 16 प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. तर या टॅक्सीचा वेळ ताशी 60 ते 70 किमी एवढा असणार आहे. संपूर्णपणे इलेक्ट्रीकवर धावणाऱ्या या पॉड टॅक्सीसाठी सिमेंटचे गर्डर बसवण्यात येणार असून या टॅक्सीचे व्हिल आणि ट्रॅक स्टीलचे असणार आहेत. अशी माहिती संबधींत कंपनीच्या प्रतिनिधींनी प्रताप सरनाईक यांना दिली. घोडबंदर भागातील भाईंदर पाडा ते विहंग हील या एक किमीच्या 40 मीटर रस्त्याच्या वरच्या भागातून ही टॅक्सी धावणार आहे. प्रायोगीक तत्वावर ही हवाई वाहतुक सुरू होणार असल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

हेही वाचा – Datta Gade : आरोपी दत्ता गाडेने दोनदा केला आत्महत्येचा प्रयत्न, वैद्यकीय अहवालात धक्कादायक माहिती



Source link

Comments are closed.