PM मोदींच्या भेटीवेळी ते बघताच जय शाह भावूक, एक मोठा निर्णय अन् प्रतिका रावलच्या डोळ्यात पाणी,
प्रतिका रावलला अखेर विश्वचषक विजेतेपदक मिळणार : आयसीसी महिला वर्ल्ड कप 2025 जिंकून टीम इंडिया पहिल्यांदाच विश्वविजेती ठरली. मात्र या ऐतिहासिक विजयाच्या प्रवासात सलामी फलंदाज प्रतिका रावल हिचे नशीब साथ देऊ शकले नाही. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात तिच्या पायाला दुखापत झाल्याने ती स्पर्धेतून बाहेर पडली. तिच्या जागी शेफाली वर्मा संघात आली आणि तिनेच सेमीफायनल व फायनल सामने खेळले. परंतु जेव्हा विजेत्या खेळाडूंना पदके देण्यात आली, तेव्हा प्रतिका देखील पदक परिधान करताना दिसली. त्यामुळे चाहत्यांमध्ये प्रश्न निर्माण झाला, ती अंतिम संघात नव्हती, मग तिला पदक कसं मिळालं?
प्रतिका रावल काय म्हणाली?
यावर अखेर प्रतिका रावलनेच मौन तोडत जय शाह यांचं नाव पुढे केलं. एका वृत्तवाहिनीशी बोलताना ती म्हणाली, “जय शाह सरांनी आमच्या टीम मॅनेजरला मेसेज करून सांगितलं की, माझं मेडल ते स्वतः अरेंज करतील. त्यामुळे मला माझं स्वतःचं मेडल मिळालं. जेव्हा मी ते उघडलं आणि त्याच्याकडे पाहिलं, तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी फार भावनिक होत नाही, पण तो क्षण खरोखर खास होता.”
प्रतिका रावलची कामगिरी
प्रतिका रावलने वर्ल्ड कपच्या लीग टप्प्यात जबरदस्त कामगिरी केली होती. तिने 7 सामन्यांत 51.33 च्या सरासरीने 308 धावा केल्या. त्यात न्यूझीलंडविरुद्धच्या निर्णायक सामन्यात केलेल्या 122 धावांच्या शानदार खेळीने भारताला सेमीफायनलमध्ये पोहोचवले. दुखापतीनंतरही ती संघासोबत राहिली आणि शेवटी विजयानंतर सगळ्यांसोबत जल्लोषात सामील झाली. प्रतिका रावल जरी फायनल खेळू शकली नाही, तरी तिचं योगदान आणि जय शाह यांच्या हस्तक्षेपामुळे तिलाही “वर्ल्ड चॅम्पियन”चा मान आणि पदक मिळालं, आणि हेच तिच्यासाठी आयुष्यभराचं अभिमानाचं क्षण ठरलं.
टीम इंडियाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
महिला वर्ल्ड कप 2025 जिंकून टीम इंडिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला गेली होती, तेथे फोटोसेशन आणि गप्पा गोष्टी झाल्या, त्यावेळी पहिल्यांदा नरेंद्र मोदी यांनी महिला खेळाडूंना खास लाडू दिले. त्यावेळी प्रतिका रावल व्हिलचेअरवर बसलेली होती. मग नरेंद्र मोदी ते तिच्याजवळ गेले आणि तिला विचारतात, तुला काय आवडतं? मग तिला स्नॅक्स खायला देतात.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.