धंदे से बडा कोई धर्म नही होता; महाकुंभमेळ्यात नाविक कुटुंबाने 45 दिवसांत कमावले 30 कोटी
प्रयाग्राज: उत्तर प्रदेशच्या धरतीवर शतकातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा प्रयाग्राजात प्रयाग्राज. यंदा मोठ्या उत्साहात आणि भाविकांच्या गर्दीने पार पडला. या कुंभमेळ्यात तब्बल 60 कोटींपेक्षा जास्त भाविकांनी गंगास्नान केल्याची माहिती आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून आणि जगभरातील भाविकांनी येथील गंगा नदीत जाऊन डुबकी मारली. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योगपतीही प्रयागराजमध्ये जाऊन भक्तीरसात न्हाऊन आल्याचं पाहायला मिळालं. या महाकुंभमेळ्यातील प्रत्येकाचे अनुभव हे संस्मरणीय आणि आयुष्यभर आठवण देणारे ठरले. गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरच्या घटनेचा अपवाद वगळता महाकुंभमेळा उत्साहात आणि सर्वच अंगानी उल्लेखनीय ठरला. या महाकुंभमेळ्यात हजारो कोटींची उलाढाल झाली असून अगदी लिंबाच्या काडीचे दंतमंजन विकण्यापासून ते अनेक उद्योग पाहायला मिळाले. त्यामध्ये, येथील नाविक म्हणजे होडी चालवणाऱ्या व्यवसायिकांनाही महाकुंभमेळ्याने मोठी कमाई करुन दिली. युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (योगी आदित्यनाथ) यांनी एका नाविक कुटुंबीयांची सक्सेस स्टोरी सांगितली आहे.
कुंभमेळा परिसरात मौनी अमावस्येला झालेल्या चेंगराचेंगरीनंतर प्रशासन अधिक सतर्क झाले होते, प्रयागराजमध्ये मर्यादित भाविकांनाच प्रवेश दिला जात होता. त्यामुळे विविध जिल्ह्यातून प्रयागराजमध्ये प्रवेश करणाऱ्या रस्त्यांवर अनेक किलोमीटरची वाहतूक कोंडी होऊन भाविकांना 8-10 तास जाममध्ये अडकून पडावे लागले. प्रयागराजमध्ये 13 जानेवारीपासून आतापर्यंत 60 कोटींहून अधिक भाविकांनी त्रिवेणी संगमात स्नान केले असून हा आकडा भुवया उंचावणार आहे. तब्बल 60 कोटी भाविक प्रयागराजमध्ये येऊन गेल्यामुळे तेथे मोठी आर्थिक उलाढाल झाली असून हजारो कोटींचा व्यवसायही झाला आहे. अगदी रुद्राक्षांची माळ विकणारी मोनालिसा, लिंबाची काडी दंतमंजन विकणारा मुलगा ते होडीमधून त्रिवेणी संघम व घाटाचे दर्शन घडवणारे नाविक बांधवांनीही मोठी कमाई केल्याचं पाहायला मिळालं.
45 दिवसांत 30 कोटी कमावले
कोई भी धंदा छोटा या बडा नही होता, धंदे से बडा कोई धर्म नही होता, हा चित्रपटातील डायलॉग प्रयागराजमधील नाविक कुटुंबाची सक्सेस स्टोरी उलगडणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेत माहिती देताना येथील एका नाविकाची सक्सेस स्टोरी सांगितली. एका नाविक कुटुंबीयांने 45 दिवसांत 30 कोटी रुपयांची कमाई केल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं, त्यावेळी सर्वांनी बाक वाजवून दाद दिली. येथील नाविकांचे शोषण होत आहे, त्यांना चांगल्या सुविधा दिल्या जात नाहीत असा आरोप विरोधकांनी केला. मात्र, येथील एका नाविक कुटुंबाने 45 दिवसांत 30 कोटी रुपयांची कमाई केली. या नाविक कुटुंबाकडे 135 नौका (होडी) आहेत. एका नौकेने 45 दिवसांत 23 लाख रुपयांचा गल्ला जमवला. जवळपास 50 ते 55 हजार रुपये प्रतिदिन कमाई या नौकाचालक नाविकांनी केल्याची माहिती योगी आदित्यनाथ यांनी दिली. मी 27 फेब्रुवारी रोजी प्रयागराजमध्ये गेलो होतो, तिथे गंगा नदीची पूजा केली, स्वच्छता व आरोग्य सेवकांचा सन्मानही केला. त्यानंतर, नाविकांसोबतही आम्ही संवाद साधला. परिवहन व रेल्वेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसोबतही आम्ही उत्तम कार्यक्रम केला होता, अशी माहित योगी आदित्यनाथ यांनी दिली.
एका नाविक कुटुंबाने महाकुभ -2025, प्रयाग्राजमध्ये 45 दिवसांत 30 कोटी कमावले आहेत … pic.twitter.com/bqj3oxyeio
– योगी आदित्यनाथ (@myogiadityanath) 4 मार्च, 2025
दरम्यान, महाकुंभ मेळ्यात हजारो कोटींची उलाढाल झाली असून लहान सहान उद्योग धंद्यांपासून ते मोठ्या व्यवसायकांनीही मोठी कमाई केली आहे. त्यामुळेच, मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ही सक्सेस स्टोरी अनेकांना उद्योग व्यवसायासाठी प्रेरणा देणारी आहे.
हेही वाचा
धक्कादायक ! ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रीमच्या कोनला बुरशी; ग्राहकाची पोलिसात तक्रार, मनसे रस्त्यावर
अधिक पाहा..
Comments are closed.